पुन्हा भारतासाठी टेस्ट खेळायचीये...; MI विरूद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर Ajinkya Rahane झाला भावूक

मुंबई विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने यंदाच्या सिझनमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. अवघ्या 19 बॉल्समध्ये अजिंक्यने 52 रन्स करत गोलंदाजांना चांगलंच चोपलं. दरम्यान सामन्यानंतर बोलताना रहाणेने पुन्हा टीम इंडियामध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. 

Updated: Apr 9, 2023, 04:34 PM IST
पुन्हा भारतासाठी टेस्ट खेळायचीये...; MI विरूद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर Ajinkya Rahane झाला भावूक title=

Ajinkya Rahane : मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) शनिवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)  विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्या पराभावाला सामोरं जावं लागलं होतं. तर चेन्नईच्या टीमचा हा सलग दुसरा विजय होता. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). मुंबई विरूद्धच्या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेने तुफान खेळी साकारली. दरम्यान सामन्यानंतर बोलताना अजिंक्य भावूक झालेला दिसला.

वानखेडेवर अजिंक्यची तुफान खेळी

मुंबई विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने यंदाच्या सिझनमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. अवघ्या 19 बॉल्समध्ये अजिंक्यने 52 रन्स करत गोलंदाजांना चांगलंच चोपलं. दरम्यान सामन्यानंतर बोलताना रहाणेने पुन्हा टीम इंडियामध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी रहाणे भावूक झालेला दिसला. 

पुन्हा टीम इंडियासाठी खेळायचंय- रहाणे

सामना संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) त्याच्या खेळीबद्दल सांगितली. यावेळी रहाणे म्हणाला, आजच्या सामन्यात केलेल्या खेळीचा मी पुरेपुर आनंद घेतला. मला टॉसपूर्वी समजलं की, आजच्या सामन्यात मी खेळणार आहे. मी केवळ चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. नेहमी टायमिंगवर लक्ष दिलं पाहिजे. मुळात आयपीएल एक मोठी टूर्नामेंट आहे आणि तुम्हाला माहिती नाही की, तुम्हाला कधी संधी मिळेल.

वानखेडे स्टेडियममध्ये खेळायला मला नेहमी आनंद होतो. मुख्य म्हणजे मी इथे एकदाही टेस्ट सामना खेळलो नाहीये. मला इथे टेस्ट सामना खेळयचा आहे, असंही रहाणे पुढे म्हणाला. रहाणेच्या या वक्तव्यावरून त्यावा पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टेस्ट खेळायची असल्याचं समजतंय.

मोईन अलीमुळे मिळाली रहाणे संधी

मुंबईविरूद्धच्या सामन्यात मोईन अलीच्या जागी रहाणेला संधी देण्यात आली. मिळालेल्या संधीचं रहाणेने अगदी सोनं केलंय. सामन्याच्या दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने मुंबईची गोलंदाजांना अक्षरशः झोडून काढलं. आणि यंदाच्या सिझनमधील पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतकंही झळकावलं.

शनिवारी अजिंक्य रहाणे चेन्नईकडून पहिलाच सामना खेळायला मैदानात आला होता. यावेळी मैदानात उतरताच अजिंक्यने त्याच्या तुफान स्टाईलने खेळायला सुरुवात केली. यामध्ये अवघ्या 19 बॉल्समध्ये रहाणेने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.