INDVsSA:पराभवानंतर राहुल-रहाणेने गाळला घाम, रोहित-धवनवर संकट

द. आफ्रिकेनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळू शकलेले लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी न्यूलँड्समधील सराव सत्रात सहभाग घेतला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 12, 2018, 09:01 AM IST
INDVsSA:पराभवानंतर राहुल-रहाणेने गाळला घाम, रोहित-धवनवर संकट title=

केपटाऊन : द. आफ्रिकेनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळू शकलेले लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी न्यूलँड्समधील सराव सत्रात सहभाग घेतला. 

पहिल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव सहन करावा लागला. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली.

राहुल-रहाणेने गाळला घाम

या सामन्यानंतर लोकेश आणि अजिंक्य रहाणे यांनी जोरदार सराव केला. या दोघांनाही पहिल्या कसोटीत संघात स्थान देण्यात आले नव्हते. या कसोटीत शिखर आणि रोहितला स्थान देण्यात आल्याने कोहलीवर जोरदार टीकाही झाली.

त्यामुळे दुसऱ्या सामन्यापूर्वी लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेसह इशांत आणि पार्थिव पटेलने जोरदार सराव केला. या दोघांनी दीड तास सराव केला. यावेळी त्यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणही होते.

राहुल आणि रहाणेने बाजूबाजूला नेट्सवर सराव केला. इशांतने गोलंदाजीचा सराव केला. तर पार्थिवने सगळ्यात शेवटची फलंदाजीचा सराव केला.

पहिल्या कसोटीतील खेळाडूंच्या निवडीवरुन कोहलीवर जोरदार टीका झाली होती. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही रहाणे आणि इशांतला बाहेर ठेवण्यावरुन  चिंता व्यक्त केली होती.