...तर मी दिल्लीचं कर्णधारपद नाकारलं असतं; अक्षर पटेलचा सर्वांत मोठा खुलासा!

Akshar Rajeshbhai Patel, delhi capitals: आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडणारी टीम ही दिल्ली कॅपिटल्स होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) कॅप्टन्सीवर टीका होताना दिसते. अशातच आता दिल्लीचा उपकर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) याने मोठं वक्तव्य केलंय.

Updated: May 21, 2023, 06:18 PM IST
...तर मी दिल्लीचं कर्णधारपद नाकारलं असतं; अक्षर पटेलचा सर्वांत मोठा खुलासा! title=
Akshar Rajeshbhai Patel, delhi capitals

Axar Patel On Delhi Capitals Captaincy: दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) जखमी झाल्यानंतर दिल्लीचं नशिबच बदलल्याचं दिसून आलंय. यंदाच्या हंगामात दिल्लीचा 14 सामन्यात फक्त 5 वेळा विजय मिळवता आला आहे. तर 9 सामन्यात दिल्लीचा पराभव स्विकारावा लागलाय. या वर्षी आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडणारी टीम ही दिल्ली कॅपिटल्स होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या नेतृत्वावर म्हणजेच डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) कॅप्टन्सीवर टीका होताना दिसते. अशातच आता दिल्लीचा उपकर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) याने मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला Axar Patel?

मी सिरीजच्या मध्यातच कोणालाही काही बोललो नाही. जर सिरीजच्या मधल्या काळात माझ्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी आली असती तर मी ती घेतली नसती. तुमचा संघ अशा वाईट हंगामातून जात असताना, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे ते आणखी वाईट होतं. तुम्हाला तुमच्या खेळाडूंना, तुमच्या कर्णधाराला पाठीशी घालण्याची गरज आहे आणि जर तुम्ही हंगामाच्या मध्यात कर्णधारपद बदलला तर तो चांगला संदेश जात नाही, असंही अक्षर (Axar Patel On Delhi Capitals Captaincy) म्हणतो.

आणखी वाचा - महेंद्रसिंह धोनी अजूनही अनफीट? प्लेऑफ खेळणार की नाही? डेव्हिड कॉर्नवेचा मोठा खुलासा, म्हणतो...

आम्ही एक संघ म्हणून एकत्रितपणे अपयशी ठरलो, आणि तुम्ही कर्णधाराला दोष देऊ शकत नाही. असंही नाही की कोणा एका खेळाडूमुळे आम्ही सामने हारलो. पराभव हा सर्वांचा आहे. मी जर टीमचं नेतृत्व केलं असतं तर काही गोष्टी सुधारल्या असत्या का? असा सवाल देखील अक्षरने यावेळी उपस्थित केल्या आहेत. काहीही झालं तरी ड्रेसिंग रूममधील वातावरण खराब होता कामा नये, असं म्हणत त्याने थेट मुद्द्याला हात घातला.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना अक्षर पटेलने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाला 3 विजय मिळवून दिलेत. तर अनेक सामन्यात त्याने टीमसाठी अँकर म्हणून देखील काम केलंय. बँटिंग ऑर्डर जेव्हा जेव्हा ढासळली तेव्हा अक्षर मैदानात पाय रोवून उभा होता. दिल्लीकडून कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आणि उपकर्णधार अक्षर पटेलला वगळता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही.