Duvin Lasith Malinga: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या मुलाने म्हणजेच अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याने मागील आयपीएल हंगामात डेब्यू केला. मुंबई इंडियन्सकडून त्याला फक्त 4 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात अर्जुनने 3 विकेट्स देखील पटकावल्या आहे. गेल्या 3 वर्षापासून आयपीएल अर्जुन तेंडूलकर डेब्यूच्या प्रतिक्षेत होता. मात्र, अखेर त्याला संधी मिळाली आणि सर्वांच्या नजरा अर्जुनवर होत्या. अशातच आता आणखी एक स्टार किड्स आयपीएलमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.
सर्वांच्या लक्षात राहिल अशी श्रीलंकन बॉलर लसिथ मलिंगा याची बॉलिंगची अॅक्शन चिल्ल्या पिल्ल्यांना देखील माहित आहे. मैदानावर मलिंगा स्टाईल बॉलिंग तर सर्वांनीच केली असेल. त्यातच आता मलिंगाचा मुलगा डुविन मलिंगा देखील वडिलांसाठी गोलंदाजी शिकला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
शेअर करण्यात आलेला या व्हिडीओमध्ये मलिंगाचा मुलगा नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसतोय. त्यावेळी मलिंगा त्याला नेट्सच्या बाहेरून कमेंट करताना दिसतोय. त्याला सरळ आणि फास्ट बॉलिंगची गरज आहे, असं लसिथ मलिंगा म्हणताना दिसतोय. तो ती कला लवकर शिकू शकतो, असंही लसिथ मलिंगाने लेकाच्या बॉलिंगवर बोललं आहे. त्यावेळी डुविनने एक घातक यॉर्कर बॉल करत दांड्या उडवल्या. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, लसिथ मलिंगा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. अलीकडेच एमआय न्यूयॉर्कने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. डुविन मालिंका त्याच्या वडिलांच्या शैलीत गोलंदाजी करत असल्याचं दिसल्याने आता अनेकांनी त्याचं कौतूक केलंय. त्याला आणखी प्रशिक्षण दिलं तर नवा मलिंगा श्रीलंकेडून खेळू शकतो, असं मत नेटकऱ्यांनी मांडलंय.