Video: आदिल रशीदच्या या बॉलची शेन वॉर्नच्या त्या बॉलशी तुलना

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला. 

Updated: Sep 12, 2018, 10:23 PM IST
Video: आदिल रशीदच्या या बॉलची शेन वॉर्नच्या त्या बॉलशी तुलना title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला. याचबरोबर भारतानं ५ टेस्ट मॅचची सीरिज ४-१नं गमावली. इंग्लंडनं ठेवलेल्या ४६४ रनचा पाठलाग करताना भारतीय टीम ३४५ रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून लोकेश राहुलनं १४९ रन तर ऋषभ पंतनं ११४ रनची खेळी केली. ऋषभ पंतचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पहिलं शतक होतं. ९५ रनवर असताना पंतनं सिक्स मारून त्याचं पहिलं शतक झळकावलं. याआधी टेस्ट क्रिकेटमधील पहिली रनही पंतनं सिक्स मारूनच केली होती.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा राहुल ४६ रनवर नाबाद होता. तेव्हा टीमचा स्कोअर ५८-३ एवढा होता. पण लोकेस राहुलनं रहाणेसोबत पार्टनरशीप करून इनिंगला आकार दिला. राहुल आणि रहाणेनं ११८ रनची पार्टनरशीप केली. अजिंक्य रहाणेची विकेट गेल्यानंतर हनुमा विहारी शून्य रनवर आऊट झाला. यानंतर राहुलनं पंतबरोबरही शतकी पार्टनरशीप केली. तर राहुल आणि पंतमध्ये २०४ रनची पार्टनरशीप झाली.

राहुल आणि पंतची पार्टनरशीप तोडण्याचं काम केलं आदिल रशीदनं. आदिल रशीदच्या एका जबरदस्त बॉलवर लोकेश राहुल आऊट झाला. यानंतर भारतीय बॅटिंग गडगडली आणि शेवटच्या ५ विकेट फक्त २० रनवर गेल्या.

आदिल रशीदनं टाकलेल्या या बॉलची तुलना शेन वॉर्ननं माईक गेटिंगला टाकलेल्या बॉलशी होत आहे. शेन वॉर्ननं माईक गेटिंगला टाकलेला तो बॉल शतकातला सर्वोत्तम बॉल असल्याचं बोललं गेलं. आता आदिल रशीदनं टाकलेला हा बॉल २१ व्या शतकातला सर्वोतम बॉल असल्याची चर्चा सुरु झाली आहे.