नवी दिल्ली : भारताच्या हरमनप्रीत कौर याने नाबाद १७१ धावा करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध २८१ धावांचा डोंगर उभा केला आणि फायनलचं तिकीट मिळविलं, या हरमनप्रित कौरला कांगारूंची शिकार करण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने सल्ला दिला होता.
गेल्या वर्षी २०१६ मध्ये हरमनप्रित महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. आपल्या धुवाँधार खेली आणि षटकारांमुळे माजी क्रिकेटपटू अॅडम गिलक्रीस्ट तिचा फॅन झाला होता.
हरमनच्या या खेळीनंतर ऑस्ट्रेलिया माजी विकेटकीपर आणि आक्रमक फलंदाज अॅडम गिलक्रीस्टने ट्विट केले होते. तसेच हरमनला आक्रमक फलंदाजीसाठी प्रेरित केले होते. गिलक्रिस्टने हरमनला ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे व्हिडिओ पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची गोलंदाजी योग्यरित्या समजू शकेल.
Seriously impressed with @ImHarmanpreet in last nights #WBBL02 Classy, skillful. A wonderful addition to the tournament.
— Adam Gilchrist (@gilly381) December 10, 2016
Thank You @gilly381 Sir, Means a lot https://t.co/guHBN2A8Vr
— Harmanpreet Kaur (@ImHarmanpreet) December 11, 2016
हरमनला आजपण ती तारीख आणि वेळ आठवते, जेव्हा गिलकिस्टने ट्वीट केले होते. हरमनसाठी हे ट्वीट एखादी ट्रॉफी जिंकण्यापेक्षा कमी नव्हते. हरमन आपल्या विकेटकिपींगच्या स्किललाही गंभीरपणे घेतले आहे.