दिल्ली : क्रिकेटचे काही खेळाडू मैदानाप्रमाणे सोशल मीडियावरही तुफान फटकेबाजी करतात. असाच एक क्रिकेटर म्हणजे न्यूझीलंडचा ऑलराऊंडर प्लेअर जेम्स नीशम. जेम्स नीशम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह दिसून येतो. असंच एकदा जेम्सने एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रश्नाला मजेदार उत्तर दिलं होतं.
आयसीसी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव झाला होता. यानंतर नीशमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेलेलं. परंतु अनेकांना अजूनही त्याच्याबद्दल अपुलकी वाटते. दरम्यान 2 वर्षांपूर्वी नीशमला ट्विटरवर एक विचित्र ऑफर देण्यात आली होती, ज्यावर त्याने मजेशीरपणे उत्तर दिलं होतं.
Jimmy would you like to be daddy of my future kids
— Sehar Shinwari (@SeharShinwari) August 28, 2019
Jimmy I love you
— Sehar Shinwari (@SeharShinwari) August 28, 2019
नीशमने 2 वर्षांपूर्वी Los Angeles Airportवरून प्रवास बऱ्याचदा प्रवास केल्यानंतर भिती कमी झाल्याचं म्हटलं होतं. यावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने नीशमला थेट माझ्या मुलांचा पिता बनशील का असं विचारलं होतं.
जेम्स नीशमच्या ट्विटवर पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारीने रिप्लाय दिला होता. तिने लिहिलेलं, 'जिमी तुला भविष्यात माझ्या मुलाचे पिता व्हायला आवडेल? तसंच आणखी एका ट्विटमध्ये 'जिमी आय लव्ह यू.' असंही लिहिलं होतं.
I really feel like the emojis were unnecessary https://t.co/tH3g0jCWe4
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) August 28, 2019
पाकिस्तानी अभिनेत्रीच्या या ऑफरला नीशमने मजेशीर उत्तर दिलं होतं. तो म्हणालेला, 'मला वाटतं की यात इमोजीची गरज नव्हती.' ट्विटर युजर्सना नीशमची उत्तर आवडलं आणि जिमीचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरलही झालं होतं.