Telangana Hind Kesari : पुण्याचा अभिजीत कटके 'हिंद केसरी'; पटकावली मानाची गदा!

Hind Kesari final : महाराष्ट्राच्या अभिजीत कटके (Abhijit Katke) याने हरियाणाच्या सोमवीरला (somveer) टिकू दिलं नाही. हरियाणाच्या सोमवीर याला 4-0 अशा फरकाने लोळवत खिताबावर नाव कोरलं आहे.

Updated: Jan 8, 2023, 09:37 PM IST
Telangana Hind Kesari : पुण्याचा अभिजीत कटके 'हिंद केसरी'; पटकावली मानाची गदा! title=
Abhijit Katke,Hind Kesari

Abhijit Katke Hind Kesari :  तेलंगणामधील हिंद केसरी (Telangana Hind Kesari 2023) स्पर्धेतील (Abhijeet Katke) फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला आहे. अभिजीत कटके विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष पहायला मिळत आहे. अभिजीतने सामन्यात सोमवीरला एकही संधी दिली नाही आणि सामना 4-0 ने जिंकला आहे. (Abhijit Katke win telangana Hind Kesari 2023)

भारतीय कुस्तीतील (Wrestling) सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी (Hind Kesari final) सामन्याचा अंतिम सामना रविवारी खेळला गेला. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटके (Abhijit Katke) याने हरियाणाच्या सोमवीरला (somveer) टिकू दिलं नाही. हरियाणाच्या सोमवीर याला 4-0 अशा फरकाने लोळवत खिताबावर नाव कोरलं आहे.

अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी (Maharastra Kesari) राहिला आहे. हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे जाते की हरियाणाकडे अशी उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, अभिजीतने धोबीपछाड देत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 2017 मध्ये  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटके याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता.

आणखी वाचा - Mhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर

दरम्यान, अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशनतर्फे हिंद केसरी (Hind Kesari) हा किताब देण्यात येतो.  हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. याआधी 2013 साली पुण्याच्या अमोल बराटेने (Amol Barate) हा किताब पटकावला होता. त्यानंतर आता अभिजीत कटके याने पुण्याचा अभिमान आणखीन उंचावल्याचं पहायला मिळतंय.