एबी डिव्हिलियर्सला पुढचा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा, पण...

२०१९ च्या वर्ल्ड कपआधी एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सगळ्यांना धक्का दिला होता.

Updated: May 19, 2019, 05:28 PM IST
एबी डिव्हिलियर्सला पुढचा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा, पण... title=

मुंबई : २०१९ च्या वर्ल्ड कपआधी एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सगळ्यांना धक्का दिला होता. क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली, याबद्दल एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला आहे. गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोमध्ये एबी डिव्हिलियर्स आला होता.

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये मी खेळत नाहीये, पण २०२३ सालचा वर्ल्ड कप मी खेळेन, फक्त त्यावेळी धोनीनेही वर्ल्ड कप खेळावा, असं एबी डिव्हिलियर्स हसत म्हणाला. मी २०२३ साली ३९ वर्षांचा असीन, काय माहित? असे संकेत एबी डिव्हिलयर्सने दिले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती का घेतली? यावरही एबी डिव्हिलयर्सने खुलासा केला आहे. 'निवृत्तीआधी ३ वर्ष मी सगळ्या सीरिजमध्ये खेळत नव्हतो. मी ठराविक सीरिजची निवड करत होतो. यावरून माझ्या मर्जीवर मी क्रिकेट खेळत असल्याची टीका झाली. पण मी टीमसाठी खेळणारा खेळाडू होतो. तसंच निवृत्ती घेण्यामागे कुटुंबाचं कारणही आहे. १५ वर्ष मी सातत्याने क्रिकेट खेळत होतो. याचबरोबर निवृत्ती घेण्यामागे काही दुसरीही कारणं आहेत,' असं एबीने सांगितलं.

एबी डिव्हिलयर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो वेगवेगळ्या देशात टी-२० लीग खेळत आहे. आयपीएलमध्ये एबी डिव्हिलयर्स बंगळुरूकडून खेळतो. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बंगळुरूची कामगिरी निराशाजनक राहिली. पॉईंट्स टेबलमध्ये बंगळुरूची टीम शेवटच्या म्हणजेच ८व्या क्रमांकावर राहिली.