एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या मुलाला देणार भारतीय नाव

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सला भारतामध्ये आजपर्यंत बरच प्रेम मिळालं आहे.

Updated: May 18, 2018, 07:20 AM IST
एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या मुलाला देणार भारतीय नाव  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सला भारतामध्ये आजपर्यंत बरच प्रेम मिळालं आहे. आयपीएलमध्ये मागच्या १० वर्षांपासून एबी डिव्हिलियर्स बंगळुरूकडून खेळत आहे. धोनी आणि कोहलीप्रमाणेच एबीचेही भारतात मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत. एबीलाही भारतात राहायला आणि इथली संस्कृती जोपासायला आवडतं. म्हणूनच एबी आता त्याच्या तिसऱ्या मुलाचं नाव ताज ठेवणार आहे. २०१२ सालच्या आयपीएलमध्ये एबीनं त्याच्या बायकोला ताजमहालामध्ये प्रपोज केलं होतं. त्यामुळे ताजमहालाचं एबीच्या आयुष्यात महत्त्व आहे. एबीची तेव्हाची गर्लफ्रेंड आणि आताची बायको डॅनिलेला प्रपोज करण्यासाठी दिल्लीवरून आग्र्याला गेला होता. ताजमहालात पोहोचल्यावर एबीनं तिला लग्नाची मागणी घातली.

२०१५ साली एबी आणि डॅनिलेला पहिला मुलगा झाला. त्याचं नाव एबी ज्युनियर ठेवण्यात आलं. २०१७ साली झालेल्या दुसऱ्या मुलाचं नाव त्यांनी जॉन रिचर्ड ठेवलं. आता तिसऱ्या बाळाचं नाव ताज ठेवणार असल्याचं एबी एका मुलाखतीमध्ये म्हणाला. याआधी मला मुलाचं नाव कर्नाटक ठेवायचं होतं पण ताज हे नाव मुलासाठी ताकदवर असल्याचं एबीला वाटतंय.

जॉन्टी रोह्डसनंही दिलं भारतीय नाव

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा क्रिकेटपटू जॉन्टी रोह्डसनंही त्याचा मुलीचं नाव इंडिया ठेवलं. आयपीएलच्या आठव्या मोसमावेळी जॉन्टीला मुंबईमध्ये दुसरी मुलगी झाली. त्यामुळे त्यानं मुलीचं नाव मुंबई ठेवलं.