Asia Cup 2023 : टीम इंडियासोबत 1524 दिवसांनी बनतोय विचित्र योगायोग; आकडे वाचून डोकं गरगरेल

India vs Pakistan, Reserve Day: आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र यावेळी एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. काय आहे हा नेमका योगायोग जाणून घेऊया.

सुरभि जगदीश | Updated: Sep 11, 2023, 12:20 PM IST
Asia Cup 2023 : टीम इंडियासोबत 1524 दिवसांनी बनतोय विचित्र योगायोग; आकडे वाचून डोकं गरगरेल title=

India vs Pakistan, Reserve Day: एशिया कपमध्ये (Asia Cup-2023)  टीम इंडियाला सोमवारी देखील पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. 10 सप्टेंबर रोजी या दोन्ही टीम आमने-सामने आल्या होत्या. मात्र पावसाने व्यत्यय आणला आणि हा सामना रिझर्व्ह डे ( Reserve Day) पर्यंत खेचला गेला. त्यामुळे आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र यावेळी एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. काय आहे हा नेमका योगायोग जाणून घेऊया.

कोलंबोमध्ये सध्या सामना सुरु

कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात सामना रंगला होता. सुपर 4 चे सामने सुरु असून या सामन्यामध्ये पावसाने खेळ केला. मात्र सामन्यापूर्वीच पावसाची शक्यता पाहता 'रिसर्व्ह डे'ची घोषणा कऱण्यात आली होती. त्यामुळे आज या सामन्याचा निकाल येण्याची शक्यता आहे. 

उर्वरित सामना आज खेळवला जाणार

दरम्यान पावसामुळे जिथे थांबला होता त्याच ठिकाणाहून हा सामना सुरू केला जाणार आहे. टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 24.1 ओव्हर्समध्ये 2 बाद 147 रन्स केलेत. आता राखीव दिवसातही टीम इंडिया या धावसंख्येसह खेळायला सुरुवात करेल. यामध्ये विराट कोहली 8 रन्स तर केएल राहुल 17 रन्सवर क्रीजवर आहेत..

1524 दिवसांनी बनतोय विचित्र योगायोग

टीम इंडिया 1524 दिवसांनंतर 'रिझर्व्ह डे'ला वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. यावेळी टीम इंडियाला पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये 'रिझर्व्ह डे'ला खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने 18 रन्सने पराभव केला होता. 

त्यानंतर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना पावसामुळे सामना 23 जूनला सहाव्या राखीव दिवशी पूर्ण झाला. यावेळीही न्यूझीलंडने भारताचा 8 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यामुळे एकंदरीत 'रिझर्व्ह डे'मध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड फारच वाईट आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा इतिहास बदलणार का? असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात आहे.