83Movie | 'या' क्रिकेटरला आठवल्याशिवाय 83 सिनेमा सुरू होत नाही

भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक वर्ल्ड कप 1983 विजयावर (World Cup 1983) आधारित असलेला '83' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात 'ओपनिंग' केली.   

Updated: Dec 25, 2021, 09:49 PM IST
 83Movie | 'या' क्रिकेटरला आठवल्याशिवाय 83 सिनेमा सुरू होत नाही title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक वर्ल्ड कप 1983 विजयावर (World Cup 1983) आधारित असलेला '83' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात 'ओपनिंग' केली. या सिनेमाच्या निमित्ताने 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे खेळाडू आणि सिनेमात त्यांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्यांनी आपला अनुभव इतरांसह शेअर केला. कपिल देव, सुनील गावसकर यांच्यासह इतर खेळाडू हिंदी वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत सहभागी झाले होते. मात्र या मुलाखतीत दरम्यान क्षण असा आला की जेव्हा प्रत्येकाचा कंठ दाटून आला. (83 movie former legend Indian cricketers Sunil Gavaskar and Kapil Dev are emotional in memory of Yashpal Sharma) 

हा दिग्गज क्रिकेटरला आठवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. वर्ल्ड कप विजेच्या संघाचं सदस्य असलेल्या यशपाल शर्मा यांच्याबद्दल आपण बोलतोय. 

मुलाखतीदरम्यान जेव्हा माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांच्याबाबत मुद्दा निघाला तेव्हा कपिल देव (Kapil Dev) यांच्यासह सर्व खेळाडू भावूक झाले.

यशपाल शर्मा यांचं नुकतंच 13 जुलै 2021 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. या विजयावर सिनेमा प्रदर्शित होत नसताने ते आपल्यात नाहीत, या जाणिवेतून प्रत्येकाला अश्रू अनावर झाले. 

नक्की काय झालं?

राजदीप सरदेसाई या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. या 83 सिनेमात जतिन सरना ऑन स्क्रीन यशपाल शर्मांची भूमिका साकारली आहे. सरदेसाई जतिनसह यशपाल शर्मा यांच्यात भूमिकेबाबत चर्चा करत होते.

या दरम्यान किर्ती आझाद यांनी आपण यशपालसाठी एक मिनिट मौन ठेवायलं हवं, असं म्हंटलं. या वेळेस उपस्थित कपिल देव, सय्यद किरमानी आणि उपस्थित सर्व भावुक झाले. 

जतिन सरना यशपाल शर्मांच्या भूमिकेबाबत काय म्हणाले? 

"यशपाल शर्मांच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट ही खास होती. त्यांच्यात असलेली लढाई वृत्ती ही कमालीची होती", असं जतिन सरना म्हणाला. 

यशपाल शर्मा यांनी 1983 च्या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत वेस्टइंडिज विरुद्ध खेळण्यात आलेला पहिला सामना, ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच असो किंवा इंग्लंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये केलेली 61 धावांची खेळी आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे.  

यशपाल शर्मांची कसोटी कारकिर्द

यशपाल शर्मा यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्याने 33.45 च्या सरासरीने 1 हजार 606 धावा केल्या. 140 ही त्यांची सर्वोच्च खेळी होती.