चेन्नई सुपरकिंग्जमध्ये ३ खेळाडूंचं आगमन, तर एक दिग्गज बाहेर

आयपीएलच्या पुढच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघ सर्वांच्या नजरेत असेल. 2 वर्षानंतर हा संघ आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 23, 2017, 11:39 AM IST
चेन्नई सुपरकिंग्जमध्ये ३ खेळाडूंचं आगमन, तर एक दिग्गज बाहेर title=

मुंबई : आयपीएलच्या पुढच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघ सर्वांच्या नजरेत असेल. 2 वर्षानंतर हा संघ आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे. 

हे 3 खेळाडू टीममध्ये

सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, आम्ही आमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्याशी करार केला आहे. आम्ही या तिघांना आमच्या संघात परत मागणार आहोत. याबाबत लवकरच ते बीसीसीआयला कळवणार आहेत.

२ खेळाडूंचा लिलाव

चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू रविचंद्रन अश्विन आणि डू प्लेसिस यांना आता पुढील महिन्यात होणाऱ्या बंगळुरूमधील आयपीएलच्या लिलावात जावे लागणार आहे.  सीएसकेकडे राईट टू मॅच (आरटीएम) म्हणजेच या दोघांना आपल्या संघात ठेवण्याचा पर्याय असेल.

धोनीला मिळणार इतके कोटी

खेळाडूंची खरेदी करण्यासाठी, 2018 मध्ये फ्रँचाइजीची मर्यादा 80 दशलक्ष, 2019 मध्ये 82 कोटी आणि 2020 मध्ये 85 कोटी राहणार आहे. जर एखाद्या संघाने तीन खेळाडूंवर बोली लावली तर पहिल्या खेळाडूला 15 कोटी रुपये मिळतील, दुसऱ्या खेळाडुला 11 कोटी रुपये आणि तिसऱ्या खेळाडुला 7 कोटी रुपये मिळतील. धोनीला सीएसकेकडून 15 कोटी रुपये मिळतील अशी खात्री आहे.

आयपीएल लिलावाच्या नव्या नियमांनुसार कोणतीही फ्रॅंचायजी आपल्या पाच खेळाडूंना सोबत ठेवू शकते. प्रत्येक संघ जास्तीत जास्त तीन खेळाडूंना रिटन घेऊ शकतो किंवा तीन राईट-टू-मॅच (आरटीएम) कार्ड वापरू शकतो. जर सीएसकेने तीन खेळाडूंना रिटन केलं तर ते लिलाव प्रक्रियेदरम्यान दोन आरटीएम वापरु शकतात.