सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील पण त्याआधी खास आयोजन करण्य़ात आलं आहे.
मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांना 21 बंदुकांची सलामी दिली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये क्रिकेट पेक्षा अधिक दुसरे खेळ लोकप्रिय आहेत. पण दक्षिण आफ्रिका नॅशनल डिफेंस फोर्सने सेंचुरियन सुपरस्टोर्ट पार्कमधील प्रेक्षकांना आणि संघांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
पहिल्यांदाच असं क्रिकेट इतिहासामध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये कोणत्याही क्रिकेट सामन्याआधी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार आहे. शनिवारी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेची आर्मी आणि नेव्हीचे 50 अधिकारी म्यूजिक बँडसह मैदानावर प्रवेश करतील. यानंतर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत होईल.
राष्ट्रगीतानंतर आकाशात विमानं उडतील आणि विमानातून पॅराट्रूपरर्स जमिनीवर येतील. आर्मी आणि नेव्हीचे जवान मग दोन्ही देशांच्या टीमला 21 बंदूकांची सलामी देतील. यानंतर सेनेचे अधिकारी म्यूजिक बँडसह मैदानावर परेड करत मैदानाबाहेर जातील आणि मग सामन्याला सुरुवात होणार आहे.