मुंबई : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी हा 2019 चा वर्ल्डकप खेळणार हे जवळपास निश्चित दिसतंय.
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे की, धोनी हा पुढचा वर्ल्डकप खेळणार आहे. निवड समिती नुसार, ज्या नव्या खेळाडूंना संधी दिली गेली होती ते धोनीच्या जवळपास देखील नाही. आता सध्या नवीन विकेटकीपरची येण्याची शक्यता देखील नाही. त्यामुळे कार्तिक हा अतिरिक्त विकेटकीपर म्हणून असेल. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की धोनी हा 2019 चा वर्ल्डकप खेळणार आहे.
प्रसाद यांनी धोनीचं कौतुक म्हटलं आहे की, धोनीला जगातला नंबर 1 विकेटकीपर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात हा वर्ल्डकप खूप महत्त्वाचा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
प्रसाद यांच्या या वक्तव्याने हे साफ झालं आहे की धोनी, विराट आणि कार्तिक हे वर्ल्डकप खेळतील. सोबतच आणखी काही खेळाडूंची जागा देखील निश्चित होत चालली आहे. काही खेळाडूंनी आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर संघात जागा पक्की केली आहे.
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी