५० ओव्हरनंतर आता टी-२० वर्ल्ड कपचे वेध, पाहा संपूर्ण वेळापत्रक

५० ओव्हरचा रोमांचक क्रिकेट वर्ल्ड कप संपल्यानंतर आता टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. 

Updated: Jul 16, 2019, 05:30 PM IST
५० ओव्हरनंतर आता टी-२० वर्ल्ड कपचे वेध, पाहा संपूर्ण वेळापत्रक title=

दुबई : ५० ओव्हर क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरी केली. या दोघांमधली मॅच टाय झाल्यानंतर खेळवण्यात आलेली सुपर ओव्हरही टाय झाली, अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. ५० ओव्हरचा रोमांचक असा वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेट रसिकांना टी-२० वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. १८ ऑक्टोबर २०२० ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये टी-२० वर्ल्ड कप होईल.

या स्पर्धेमध्ये एकूण १२ टीम सहभागी होणार आहेत. यातल्या आयसीसी क्रमवारीत ३१ डिसेंबर २०१८ साली टॉप-८ टीम थेट क्वालिफाय झाल्या आहेत. तर टॉप-१० मधल्या उरलेल्या २ टीमना पहिल्या फेरीत खेळावं लागणार आहे. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या टीम थेट क्वालिफाय झाल्या आहेत. तर ९व्या आणि १०व्या क्रमांकावर असणाऱ्या श्रीलंका आणि बांगलादेशला पहिल्या फेरीत खेळावं लागणार आहे. 

श्रीलंका आणि बांगलादेशच्या टीम सहा टीमसोबत पहिली फेरी खेळतील. यामध्ये टी-२० ग्लोबल क्वालिफायरमधून येणाऱ्या टीमही असतील. २०१९च्या शेवटी टी-२० ग्लोबल क्वालिफायर खेळवण्यात येणार आहे. टी-२० ग्लोबल क्वालिफायरमध्ये आयर्लंड आणि झिम्बाब्वे या आयसीसीच्या पूर्ण वेळ सदस्यांचाही समावेश आहे. 

पहिली फेरी

ग्रुप ए ग्रुप बी 
श्रीलंका बांगलादेश
ए-२ बी-२
ए-३ बी-३
ए-४ बी-४

पहिल्या फेरीचं वेळापत्रक

तारीख  सामना ठिकाण 
१८ ऑक्टोबर श्रीलंका वि. ए-३ जिलाँग
१८ ऑक्टोबर ए-२ वि. ए-४ जिलाँग
१९ ऑक्टोबर बांगलादेश वि. बी-३ होबार्ट
१९ ऑक्टोबर बी-२ वि. बी-४ होबार्ट
२० ऑक्टोबर ए-३ वि. ए-४ जिलाँग
२० ऑक्टोबर श्रीलंका वि. ए-२ जिलाँग
२१ ऑक्टोबर बी-३ वि. बी-४ होबार्ट
२१ ऑक्टोबर बांगलादेश वि. बी-२ होबार्ट
२२ ऑक्टोबर ए-२ वि. ए-३ जिलाँग
२२ ऑक्टोबर श्रीलंका वि. ए-४ जिलाँग
२३ ऑक्टोबर बी-२ वि. बी-३ होबार्ट
२३ ऑक्टोबर बांगलादेश वि. बी-४ होबार्ट

पहिल्या फेरीतल्या प्रत्येक ग्रुपमधल्या टॉप-२ टीम म्हणजेच एकूण ४ टीम या सुपर १२ मध्ये प्रवेश करतील. सुपर-१२ ला दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या टीम वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना ग्रुप स्टेजमध्ये होणार नाही. या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना झाला तरी तो सेमी फायनल किंवा फायनलमध्येच होऊ शकेल. 

सुपर-१२

ग्रुप-१  ग्रुप-२
पाकिस्तान भारत
ऑस्ट्रेलिया  इंग्लंड
न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिज अफगाणिस्तान
ग्रुप ए विजेता ग्रुप बी विजेता
ग्रुप बी उपविजेता ग्रुप ए उपविजेता

सुपर-१२ चं वेळापत्रक

तारीख सामना ठिकाण
२४ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सिडनी
२४ ऑक्टोबर भारत वि. दक्षिण आफ्रिका पर्थ
२५ ऑक्टोबर ग्रुप-ए विजेता वि. ग्रुप-बी उपविजेता होबार्ट
२५ ऑक्टोबर न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज मेलबर्न
२६ ऑक्टोबर अफगाणिस्तान वि. ग्रुप-ए उपविजेता पर्थ
२६ ऑक्टोबर इंग्लंड वि. ग्रुप-बी विजेता पर्थ
२७ ऑक्टोबर न्यूझीलंड वि. ग्रुप-बी उपविजेता होबार्ट
२८ ऑक्टोबर अफगाणिस्तान वि. ग्रुप-बी विजेता पर्थ
२८ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज पर्थ
२९ ऑक्टोबर पाकिस्तान वि. ग्रुप-ए विजेता सिडनी
२९ ऑक्टोबर भारत वि. ग्रुप-ए उपविजेता मेलबर्न
३० ऑक्टोबर इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका सिडनी
३० ऑक्टोबर वेस्ट इंडिज वि. ग्रुप-बी उपविजेता पर्थ
३१ ऑक्टोबर पाकिस्तान वि. न्यूझीलंड ब्रिस्बेन
३१ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. ग्रुप-ए विजेता ब्रिस्बेन
१ नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान ऍडलेड
१ नोव्हेंबर भारत वि. इंग्लंड मेलबर्न
२ नोव्हेंबर ग्रुप-ए उपविजेता वि. ग्रुप-बी विजेता सिडनी
२ नोव्हेंबर न्यूझीलंड वि. ग्रुप-ए विजेता गाबा
३ नोव्हेंबर पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज ऍडलेड
३ नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया वि. ग्रुप-बी उपविजेता ऍडलेड
४ नोव्हेंबर इंग्लंड वि. अफगाणिस्तान ब्रिस्बेन
५ नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका वि. ग्रुप-ए उपविजेता ऍडलेड
५ नोव्हेंबर भारत वि. ग्रुप-बी विजेता ऍडलेड
६ नोव्हेंबर पाकिस्तान वि. ग्रुप-बी उपविजेता मेलबर्न
६ नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड मेलबर्न
७ नोव्हेंबर इंग्लंड वि. ग्रुप-ए उपविजेता ऍडलेड
७ नोव्हेंबर वेस्ट इंडिज वि. ग्रुप-ए विजेता मेलबर्न
८ नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका वि. ग्रुप-बी विजेता सिडनी
८ नोव्हेंबर भारत वि. अफगाणिस्तान सिडनी

या दोन ग्रुपमधल्या टॉप-४ टीम या सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. पहिली सेमी फायनल ११ नोव्हेंबरला सिडनीमध्ये आणि दुसरी सेमी फायनल १२ नोव्हेंबरला ऍडलेडमध्ये खेळवली जाईल. १५ नोव्हेंबरला टी-२० वर्ल्ड कपची फायनल मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होईल.