वर्ल्ड कपमधील पराभवावर कीवी कॅप्टन केन विलियमसन -अंतिम सामना कोणी हरला नाही

  इंग्लड विरोधात वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला. या पराभवाच्या नैराश्यातून सावरण्याचा प्रयत्न न्यूझीलंड टीम करीत आहे.

Updated: Jul 16, 2019, 05:20 PM IST
वर्ल्ड कपमधील पराभवावर कीवी कॅप्टन केन विलियमसन -अंतिम सामना कोणी हरला नाही title=

वेलिंगटन :  इंग्लड विरोधात वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला. या पराभवाच्या नैराश्यातून सावरण्याचा प्रयत्न न्यूझीलंड टीम करीत आहे. या फायनलच्या सामन्यावर बोलताना न्यूझीलंड टीमचा कॅप्टन केन विलियमसन म्हणतो, फायनल कुणीही हरलेलं नाही.

माजी आणि सध्याच्या सर्व क्रिकेटर्सने न्यूझीलंड टीमविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. ठरलेल्या वेळेत आणि सुपर ओव्हरमध्ये स्कोअर समान स्कोअर केल्यानंतर, सामन्यातील चौकार आणि षटकाराच्या संख्येवर आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. यानंतर क्रिकेट जगतात, हास्यास्पद नियमांची समीक्षा करण्याची मागणी होत आहे.

विलियमसन न्यूजटॉक जेडबीला म्हणाले, शेवटी कोणतीच टीम फायनल जिंकली नाही, पण ट्रॉफीतर कोणत्यातरी एका टीमला द्यायचीच आहे. अपयश स्वीकारल्यामुळे सगळीकडे विलियमसन आणि त्यांच्या टीमची प्रशंसा होत आहे. त्यांनी सांगितले की टुर्नामेंटच्या नियमांबद्दल सगळ्यांना आधीच माहित होते.

सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विलियमसनला, या नियमाबद्ल विचारल्यावर तो म्हणाले, तुम्ही कधी विचारपण नाही करू शकत की? असे प्रश्न विचारले जातील, आणि मी देखील विचार केला नव्हता की अशा प्रशांचे उत्तर देईल.

तसेच यावर पुढे बोलताना विलियमसन म्हणाला, कारण दोन्ही टीमने खूप सारी मेहनत घेतली होती. दोन प्रयत्ना नंतरही विजेता ठरत नव्हता, यानंतर जे काही झालं, ते असं व्हायला नको होतं, असंच सर्व टीम्सना वाटेल.