Semi final T20 World Cup: सेमीफायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल; राहुल द्रविड यांचे संकेत

गुरुवारी भारत विरूद्ध इंग्लंड (INDvsENG) यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडिया (Team India) थेट फायनलमध्ये मजल मारणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान सेमीफायनल जिंकण्यासाठी कोच राहुल द्रविड (Rahuk Dravid) यांनी तयारी सुरु केली आहे. 

Updated: Nov 7, 2022, 06:12 PM IST
Semi final T20 World Cup: सेमीफायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल; राहुल द्रविड यांचे संकेत title=

Semi final T20 World Cup: टीम इंडियासाठी वर्ल्डकप (T20 World Cup) आता केवळ 2 पावलं दूर आहे. गुरुवारी भारत विरूद्ध इंग्लंड (INDvsENG) यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडिया (Team India) थेट फायनलमध्ये मजल मारणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान सेमीफायनल जिंकण्यासाठी कोच राहुल द्रविड (Rahuk Dravid) यांनी तयारी सुरु केली आहे. यावेळी द्रविड यांनी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 (Playing 11) मध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

कार्तिक आणि चहलला मिळणार संधी प्लेइंग-11

द्रविड यांनी सांगितलं की, एडिलेड ग्राऊंडच्या परिस्थितीनुसार टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्यात येतील. अशात लेग स्पिनर युझवेंद्र चहलला टीममध्ये जागा मिळू शकते. कारण एडिलेडच्या पिचवर स्लो बॉलर्स फायदेशीर ठरू शकतात. याचसोबत विकेटकीपर दिनेश कार्तिकला देखील टीममध्ये जागा मिळू शकते. तर पंतला बाहेर बसावं लागू शकतं.

कोणाला मिळणार संधी?

द्रविड पुढे म्हणाले की, "15 जणांची टीम निवडताना आम्ही नीट विचार करणार आहोत. आम्ही सेमीफायनलसाठी अशी टीम निवडू जी कमकुवत नसेल. यासाठीच आम्ही एडिलेडचं मैदान पाहून टीमची निवड करणार आहोत. एडिलेडचा ट्रॅक थोडा स्लो आहे. तसंच इथे ग्रीप असून बॉल टर्नही होतो."

ग्राऊंडची स्थिती आणि पिच पाहून ठरलणार प्लेईंग 11

"बांगलादेशविरूद्ध आम्ही ज्या पिचवर खेळलो तिथे स्पिन नव्हतं. त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची विकेट होती. त्यामुळे एडिलेडचं पिच स्लो असेल तर आम्ही त्या पद्धतीने खेळाडूंची निवड करू," असंही द्रविड यांनी सांगितलंय.

इंग्लंड विरुद्ध मॅचआधी रोहित काय म्हणाला?

एडिलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल मॅच (Semi-final match against England) होणार आहे. त्याबद्दल रोहित म्हणाला की, “तिथल्या कंडीशन्सशी लवकरात लवकर जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. इंग्लंड एक चांगली टीम आहे. एक चांगला सामना होईल. आम्ही सेमीफायनलमध्ये चांगले खेळलो, तर अजून एका मोठ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. लाइन अँड लेंग्थ समजून घेण महत्त्वाचं आहे. चाहत्यांनी सर्वच सामन्यांमध्ये उदंड प्रतिसाद आणि पाठिंबा दिला. सेमीफायनलमध्ये सुद्धा आम्हाला अशीच अपेक्षा आहे”

कर्णधार रोहित शर्माने मास्टर प्लान सांगितला

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'इंग्लंड संघ सध्या खूप चांगले क्रिकेट खेळत आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यात अत्यंत काट्याची लढत होणार आहे. तो म्हणाला, 'आमचा संघ कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करून इथपर्यंत पोहोचला आहे हे आपण विसरू नये.'

रोहित पुढे म्हणाला, 'आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये जसा खेळ दाखवला तोच खेळ आम्हाला उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखवण्याची गरज आहे. टीम इंडियाच्या (Team India) प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना अत्यंत दबावाचा असेल. आम्हाला इंग्लंडविरुद्ध चांगला खेळ करण्याची गरज आहे.