New Year 2022 : 4 राशींच्या व्यक्तीना कालसर्प योगामुळे राहाव लागणार सावध

कालसर्प योगाचा 4 राशींवर होणार मोठा परिणाम पाहा तुमची रास यामध्ये आहे की नाही? 

Updated: Jan 1, 2022, 01:31 PM IST
New Year 2022 : 4 राशींच्या व्यक्तीना कालसर्प योगामुळे राहाव लागणार सावध title=

मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात लोकांना खूप आशा बाळगल्या आहेत. मात्र काही राशींच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे. त्यामुळे या राशीच्य़ा व्यक्तींनासाठी 2022 हे वर्ष खूप जास्त त्रासदायक ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प योग अशुभ मानला जातो. 4 राशीसाठी सर्वात मुश्कील वेळ असणार आहे. 

वृषभ (Taurus)
2022 मध्ये कालसर्प योग या राशीसाठी सर्वात घातक असणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सुरुवातीचे 3 महिने सावध राहावं लागणार आहे. आरोग्याचा समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय चोरांपासून सावध राहा. आपल्याला पहिले 3 महिने सावध राहावं लागणार आहे. 

कन्या (virgo)
कन्या राशीसाठी आंशिक विष योग असणार आहे. त्यामुळे बाहेरची कामं जास्त ठेवू नका. 24 एप्रिल 2022 पर्यंत खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या आणि सतर्क राहा. व्यसन असणाऱ्या लोकांनी सावध राहा. 

वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या व्यक्तींना मानसिक धक्का बसण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांच्या विचाराने प्रभावित होऊ नका. स्वत: थोडासा विचार करा. 24 एप्रिल पर्यंत स्वत: सावरणं गरजेचं आहे. सावध राहाणं आणि सतर्क राहाणं आवश्यक आहे. 

मीन (Pisces)
पहिले तीन महिने या राशीसाठी काहीतरी वेगळा अनुभव असणार आहे. जो मनातून पूर्णपणे आपल्याला हादरवून टाकणार आहे. आपली व्यक्ती दूर जाणार असेल याची खंत मनात असणार आहे. धीराने परिस्थितीवर मात करणं आवश्यक आहे. 

(विशेष सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकं आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)