मुंबई : नव्या वर्षाची नवी सुरुवात नव्या उमेदीनं आणि सकारात्मक विचाराने सर्वजण करत आहेत. जेव्हा ग्राहांचा उत्तम संयोग असतो तेव्हा तुमच्या आयुष्यात शुभ योग येतो असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं. शुभ योग येणं म्हणजे भाग्य बदलणं आणि या नव्या वर्षात काही शुभ योग असे आहे जे सुख समृद्धी आणि आर्थिक भरभराट करणार आहेत.
बुद्धादित्य योग
2022च्या माध्यात सूर्य आणि बुध एकत्र येत असल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे हा योग 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 पर्यंत असेल. हा योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. या योगामुळे बुध आणि रवि प्रभावित लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल.
शश योग
एप्रिल 2022 ते 12 जुलै 2022 पर्यंत शश योग तयार होईल. कुंडलीत शनीची विशेष स्थिती निर्माण झाली की शश योग तयार होतो. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे. या योगामुळे वर्षभरात जवळपास सर्वच राशींसाठी शनि शुभ योग सिद्ध होईल.
रूचक योग
26 फेब्रुवारी 2022 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत रुचिक योग तयार होईल. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ स्वतःच्या राशीत उच्च असेल तेव्हा हा योग तयार होतो. मंगळाचा प्रभाव असलेल्या लोकांसाठी या योगाचा प्रभाव अधिक फायदेशीर ठरेल.
गुरु-मंगल योग
ज्योतिष शास्त्रात हा सर्वात फायदेशीर योग मानला जातो. मंगळ आणि गुरूच्या मिलनाने हा योग तयार होतो. हा योग मे 2022 मध्ये मीन राशीत तयार होईल. मीन राशीच्या लोकांना हा योग तयार झाल्यामुळे अधिक फायदा होईल. या व्यतिरिक्त या योगाच्या प्रभावामुळे जीवनात समृद्धी, करिअरमध्ये प्रगती तसेच वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.
(विशेष सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकं आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)