Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ

Astrology Tipes In Marathi : जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या देवतेची पूजा करतात. पण तुम्ही राशीनुसार इष्टा देवाची पूजा केल्या तुम्हाला विशेष लाभ मिळतो, असं ज्योतिषी डॉ. जया मदन सांगते. 

नेहा चौधरी | Updated: Feb 27, 2024, 02:47 PM IST
Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ title=
Which god to worship according to your zodiac sign Whose worship gives you special benefits Astrology Tipes In Marathi

Gods as per Astrology In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये भ्रमण करतो ते चिन्ह म्हणजे त्या व्यक्तीची रास असते. त्याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीचे गुणधर्म आणि उणिवा या ठरल्या जातात. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या देवताची आराधना करतो. पण तुमच्या राशीनुसार तुमची इष्ट देवताची पूजा केल्यास तुमच्या पूजेचे दुहेरी फळ मिळतं. (Which god to worship according to your zodiac sign Whose worship gives you special benefits Astrology Tipes In Marathi )

ज्योतिषी डॉ. जया मदन हिने राशीनुसार कुठल्या देवताची पूजा केली पाहिजे याबद्दल माहिती सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तुमच्या चंद्र राशीनुसार तुम्ही कुठल्या देवाची पूजा करावी हे सांगितलं आहे. 

मेष (Aries Zodiac)  आणि वृश्चिक (Scorpio Zodiac)  

मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ असतो. मंगळाचा स्वामी हनुमान आणि प्रभु श्री राम असल्याने या लोकांनी हनुमान आणि रामाची पूजा करावी. 

मिथुन (Gemini Zodiac) आणि कन्या (Virgo Zodiac)    

मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी हा बुध ग्रह असतो.  गणेश आणि विष्णू हे बुध ग्रहाचे स्वामी असल्याने मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना या देवतांची उपासना करावी. 

कर्क (Cancer Zodiac)   

कर्क राशीचा शासक ग्रह चंद्र असल्याने या लोकांचे प्रमुख देवता भगवान महादेव आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी महादेवाची पूजा केली पाहिजे. 

तूळ (Libra Zodiac) आणि वृषभ (Taurus Zodiac) 

तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने त्यांची देवता देवी दुर्गा आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना दुर्गा देवीची उपासना केल्यास त्यांना विशेष लाभ मिळतो. 

सिंह (Leo Zodiac) 

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव असून हनुमान आणि माता गायत्रीला आराध्य करणे शुभ मानली जाते. अशा स्थितीत सिंह राशीच्या लोकांना भगवान हनुमान आणि माता गायत्रीची उपासना करणे शुभ मानले जाते.

धनु (Sagittarius Zodiac)  आणि मीन  (Pisces Zodiac)  

धनु आणि मीन राशीच्या लोकांचा स्वामी बृहस्पति आहे. गुरु ग्रहांचा स्वामी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. 

मकर (Capricorn Zodiac)  आणि कुंभ (Aquarius Zodiac) 

मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. त्याच वेळी या लोकांनी शनीचे स्वामी हनुमानजी आणि भगवान महादेवाची पूजा करावीत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)