Vipreet Rajyog: बुध ग्रहाने बनवला विपरीत राजयोग; 'या' राशींना भाग्योदयाचे प्रबळ योग

Vipreet Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 28, 2024, 10:55 AM IST
Vipreet Rajyog: बुध ग्रहाने बनवला विपरीत राजयोग; 'या' राशींना भाग्योदयाचे प्रबळ योग title=

Vipreet Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या युतीमुळे काही राजयोग तयार होतात. असं ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांना आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत. 

कर्क रास (Cancer Zodiac)

विपरित राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही लहान आणि लांब प्रवास देखील करू शकता. नोकरदार लोक देखील या महिन्यात अर्धवेळ काम करू शकतात. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची आशा आहे. तुम्हाला कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते. तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो. मित्रांच्या सहकार्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी विपरित राजयोग अनुकूल ठरू शकतो. बुध हा राशीचा आणि कर्माचाही स्वामी आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील.कोर्टाच्या कामातही तुम्हाला यश मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.

धनु रास (Dhanu Zodiac)

विपरित राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्हाला परदेशातून लाभ मिळतील. यावेळी तुमची बँक बॅलन्स वाढेल. तसेच या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभही मिळतील. यावेळी तुम्हाला स्टॉक मार्केट बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो.  तुम्ही तुमच्या करिअरची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवाल. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )