यंदा श्रावण महिना कधीपासून? किती श्रावण सोमवार असणार? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Shravan 2024 Date : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. पण मराठी पंचांगानुसार श्रावण मास कधीपासून सुरु होणार आहे जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Jul 22, 2024, 02:55 PM IST
यंदा श्रावण महिना कधीपासून? किती श्रावण सोमवार असणार? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर  title=
when is sawan starting 2024 How many Shravan Mondays will be Know all information in one click

Shravan 2024 Date : भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न सणाच्या माध्यमातून करण्यात येतोय. श्रावण महिना हा विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा एक आनंदाचा सोहळा आहे. श्रावण हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करुन शिवमूठ वाहिली जाते. अभिषेक, पठन, होम-हवन केलं जातं. तर श्रावणातील दर शुक्रवारी जिवंतीकाचं पूजन केलं जातं. तर सौभाग्यदायक मंगळागौरी उत्सव साजरा करण्यात येतो. तर नवविवाहितेला माहेराची ओढ असते. (when is sawan starting 2024 How many Shravan Mondays will be Know all information in one click)

उत्तर प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये हिंदू पंचांगानुसार आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर मराठी पंचांगानुसार महाराष्ट्रात श्रावण महिना हा कधीपासून सुरु होणार आहे. शिवाय पहिला श्रावण सोमवार तिथी आणि किती श्रावण सोमवार असणार जाणून घ्या. 

श्रावण मास कधीपासून?

मराठी पंचांगानुसार यंदा श्रावण मास 5 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर 3 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे. 

यंदा किती श्रावण सोमवारचं व्रत आहे?

यंदा श्रावण्यात एकूण 5 सोमवारच व्रत असणार आहे. 

पहिला श्रावण सोमवार - 5 ऑगस्ट 2024
दुसरा श्रावण सोमवार - 12 ऑगस्ट 2024
तिसरा श्रावण सोमवार - 19 ऑगस्ट 2024
चौथा श्रावण सोमवार - 26 ऑगस्ट 2024
पाचवा श्रावण सोमवार - 2 सप्टेंबर 2024 

मंगळगौर तिथी 2024 

पहिला मंगळगौर - 6 ऑगस्ट 2024
दुसरी मंगळागौर - 13 ऑगस्ट 2024
तिसरी मंगळागौर - 20 ऑगस्ट 2024
चौथी मंगळागौर - 27 ऑगस्ट 2024

श्रावणात धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असून महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शितला सप्तमी, दुर्गाष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी, कालाष्टमी, अजा एकादशी, शनिप्रदोष व्रत, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव असतात. 

श्रावण महिन्याचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचा पालनकर्ते श्री हरी विष्णू क्षीर सागरात योगनिद्रात जाता. यासह, ते विश्वाच्या संवादाची लगाम भोलेनाथांकडे सोपवतात. अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकतो, अशी मान्यता आहे. या महिन्यात महादेवाला भक्तीभावाने जल अर्पण केल्याने तो प्रसन्न होत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)