मुंबई : विश्वकर्मा पूजा (Vishwakarma Puja 2022) शनिवार, 17 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. दरवर्षी भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त, शिल्पकार, कारागीर, कोणतीही मशीन ज्यावर लोक काम करतात, त्याची पूजा करतात आणि प्रगतीसाठी त्यांचा आशीर्वाद घेतात. आता प्रत्येक व्यक्ती कोणतीतरी मशीन वापरतचं. उदा. कंप्यूटर आणि घरात असलेल्या काही मशीन, याशिवाय कार, बाईक. अशा परिस्थितीत लोकांनी विश्वकर्मा पूजा करणं गरजेचं आहे.
विश्वकर्मा पूजेच्या दिवशी वाहने आणि उपकरणांची पूजा केली पाहिजे, जेणेकरून रस्त्यामध्येच किंवा घाईत असताना आपल्याला धोका देत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे तुमचा मशीनवरचा खर्च कमी होतो. त्यामुळेच जर तुमच्याकडे वाहनं आहेत तर तुम्ही विश्वकर्मा पूजा करणं गरजेचं आहे.
यंदाच्या वर्षी शनिवारी विश्वकर्मा पूजा आहे, तर तुम्ही गाडीला शुक्रवारीच ऑइल, ग्रीसिंग करुन घ्या. शनिवारी या सगळ्या गोष्टी करू नका. त्यामुळे तुमची गाडी लवकर खराब होणार नाही आणि तुमचे जास्त पैसे गाडीवर खर्च होणार नाही.
विश्वकर्मा पूजेच्या दिवशी आपल्या वाहनांची साफ-सफाई करा. जर तुम्ही स्वतः गाडीला साफ करू शकत नसाल तर गॅरेज किंवा वॉशिंग सेंटरमध्ये गाडी साफ करा. त्यानंतर विश्वकर्मा पूजेच्या दिवशी एकदा हातानं कपड्यानं गाडी साफ करा.
विश्वकर्मा पूजेच्या दिवशी गाडीच्या इंजिनवर स्वस्तिक काढा. शक्य असल्यास विश्वकर्मा पूजेच्या दिवशी गाडी चालवू नका. सुपारीवर धागा गुंडाळा आणि त्यावर सिंदूरचा टिळा लावा आणि भगवान विश्वकर्माला तुमच्या गाडीचे आणि तुमचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करा. पूजेनंतर ही सुपारी वाहनात कुठेतरी ठेवा. याचा वाहनावर शुभ प्रभाव पडतो, असे म्हटले जाते.
विश्वकर्मा पूजेच्या दिवशी आपल्या गाडीची पूजा करण्याव्यतिरिक्त, लक्षात ठेवा की या दिवशी आपली गाडी कोणालाही देऊ नका. या दिवशी आपली गाडी एखाद्याला देणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे गाडीचा खर्च वाढतो. यामुळे वाटेत अनेकवेळा गाडी बंद पडू शकते.
एक विशेष गोष्ट, जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीची पूजा करत असाल, तेव्हा गाडी चालू करा आणि भगवान विश्वकर्माला प्रार्थना करा की तुमची गाडी अशीच चालत राहावी. गाडीचे आयुष्य जास्त असावे व गाडीनं प्रवासात कधीही बंद पडायला नको. (Vishwakarma Puja Date 2022 Importance Significance And Astrological Remedies For Car and gadgets )
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)