Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य

जाणून घ्या कोणत्या राशींना होईल फायदा...

Updated: Sep 9, 2022, 04:30 PM IST
Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य title=

मुंबई : ग्रहांचा राजा सूर्याची राशी बदलणार आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी सूर्य स्वराशी सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. सकाळी 07.35 च्या सुमारास सूर्याचं राशी परिवर्तन होईल. यानंतर 16 ऑक्टोबरपर्यंत सूर्य कन्या राशीत राहील. कन्या राशीतील सूर्याचं गोचर 6 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सूर्य गोचर शुभ सिद्ध होईल. (Surya Rashi Parivartan 2022)

मेष (Aries) : सूर्याच्या गोचरनं मेष राशीच्या लोकांची सर्व कामे पूर्ण होतील. अडथळे दूर होतील आणि एकामागून एक यश मिळेल. तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं आरोग्य चांगलं राहील.

 Video : ' होय, मी बीफ खातो...', Ranbir Kapoor नंतर 'या' सेलिब्रिटीचं धक्कादायक वक्तव्य

कर्क (Cancer) : सूर्याचं हे गोचर कर्क राशीच्या लोकांचे सर्व रोग दूर करेल. आरोग्य चांगले राहील. जे लोक अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्रस्त होते, त्यांच्या अडचणी दूर होतील.

तूळ (Libra) : सूर्य गोचर तूळ राशीच्या लोकांना परदेश दौऱ्यावर पाठवू शकतो. जे लोक अनेक दिवसांपासून परदेशात जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचं स्वप्न आता पूर्ण होईल. त्यासोबत त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. 

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा Lesbian? 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला धक्कादायक खुलासा

वृश्चिक (Scorpio) : सूर्या राशी बदलणार म्हणून या वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला कमाई वाढल्याचा आनंद मिळेल, यामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील.

धनु (Sagittarius) : सूर्याचं कन्या राशीत प्रवेश विशेषत: व्यावसायिकांना लाभदायक ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नफा वाढतच राहील. तब्येत सुधारेल. समस्या कमी होतील.

आणखी वाचा : Queen Elizabeth II च्या आमंत्रणाला अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार, जाणून घ्या कारण

मीन (Pisces) : सूर्याचे संक्रमण मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी देईल. त्यांना भविष्यात लाभ मिळेल. गुंतवणुकीसाठी, घर आणि कार खरेदीसाठी उत्तम काळ आहे. अविवाहितांना जोडीदार मिळेल. (surya gochar 2022 zodiac signs luck will shine from17 th september they get progress and wealth fast )

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.