Vinayak Chaturthi Vrat 2023 in marathi : फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी यावेळी खूप खास आहे. हे व्रक केल्यास यावेळी खूप शुभ असणार आहे. कारण यावेळी विनायक चतुर्थीला चार शुभ योगही जुळून आले आहेत. या दिवशी गणेशाची पूजाअर्चा केल्यास तुम्हाला धनलाभ होईल. तर यावेळी विनायक चतुर्थी 3 फेब्रुवारी 2023 ला म्हणजे गुरुवारी आहे. या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची आराधना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अडथळे दूर करणारा तुमची सर्व दु:ख आणि संकटे दूर करतो. (vinayak chaturthi 2023 February 23 thursday shubh muhurat shubh yog upay dont see moon on ganesh chaturthi in marathi )
23 फेब्रुवारीला पहाटे 03.24 वाजता सुरू होईल
24 फेब्रुवारीला दुपारी 01.33 वाजता संपेल
उदयातिथी 23 फेब्रुवारी गुरुवारी असल्याने या दिवशी विनायक चतुर्थीचा व्रत केलं जाईल.
विनायक चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.26 ते दुपारी 01.43 पर्यंत
गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत. जर तुम्हाला कोणतेही शुभ कार्य सुरू करायचं असेल तर तुम्ही या दिवशी करु शकता. या चार योगांची उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल.
गणेश चतुर्थीला सकाळपासून शुभ योग तयार होत असून तो रात्री 8.58 पर्यंत राहील. या दिवशी रवि योग देखील तयार होत आहे, जो सकाळी 6.53 पासून सुरू होईल आणि 24 फेब्रुवारीला पहाटे 3.44 पर्यंत राहील. त्यामुळे या संपूर्ण काळात तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता आणि तुमच्या जीवनातील संकटे दूर करू शकता.
विनायक चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चुकूनही चंद्र पाहू नय. श्रीकृष्णाने या दिवशी चंद्र पाहिला होता आणि त्यांच्यावर रत्न चोरल्याचा आरोप झाला होता, अशी आख्यायिका आहे. चतुर्थी सुरु झाल्यापासून तिथीच्या शेवटपर्यंत चंद्र पाहू नका, चुकूनही गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसला तर खोटे दोष टाळण्यासाठी या मंत्राचा जप नक्की करा.
'सिंह: प्रसेनमवधीत्सिंहो जाम्बवता हत:।
सुकुमारक मारोदीस्तव ह्येष स्यमन्तकर:"
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)