Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व

Vijaya Ekadashi 2024 : माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशीचं व्रत पाळलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहेत. अशा या व्रताच्या दिवशी एका विशेष कलशाला महत्त्व आहे. पौराणिक कथेमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 5, 2024, 10:25 AM IST
Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व title=
vijaya ekadashi 2024 date vijaya ekadashi vrat katha significance bhagwat ekadashi tithi muhurat puja vidhi in marathi

Vijaya Ekadashi 2024 Date, Time, Mahatva And Vrat Katha in Marathi : प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशी किंवा भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi 2024) म्हणून ओळखळी जाते. (vijaya ekadashi 2024 date vijaya ekadashi vrat katha significance bhagwat ekadashi tithi muhurat puja vidhi in marathi)

विजया एकादशी तिथी (Vijaya Ekadashi 2024 Date)

पंचांगानुसार, विजया एकादशी 6 मार्च 2024 ला सकाळी 6.30 ते 7 मार्चला पहाटे 4:13 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 6 मार्चला विजया एकादशीचे व्रत करण्यात येणार आहे. 

विजया एकादशी पारण मुहूर्त (Vijaya Ekadashi 2024 Parana Muhurat)

विजया एकादशी व्रताची पारण वेळ 7 मार्चला दुपारी 1:43 ते 4:04 वाजेपर्यंत आहे. पारणतिथीच्या दिवशी हरिवासराची समाप्ती वेळ सकाळी 09:30 वाजेपर्यंत असणार आहे. 

विजया एकादशी महत्त्व (Vijaya Ekadashi 2024 Significance)

पद्म पुराणानुसार, भगवान शंकरांनी स्वतः नारदजींना उपदेश करताना सांगितले होतं की, एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो त्याचे पूर्वज कुयोनी सोडून स्वर्गात जातात अशी मान्यता आहे. तसंच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळतं, अशी श्रद्धा आहे. 

विजया एकादशी व्रत कथा (Vijaya Ekadashi Vrat Katha)

पौराणिक कथेनुसार, जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केलं होतं. तेव्हा श्रीरामाने हनुमान आणि सुग्रीवाच्या मदतीने लंकेवर हल्ला करण्याच नियोजन केलं होतं. श्री राम आपल्या सैन्यासह लंकेला निघाले. त्यावेळी रस्त्यात समुद्र लागला. त्या समुद्रात अनेक मगरींनी आणि प्राण्यांनी भरलेला होता. ते पाहून श्री रामांने लक्ष्मणांना विचारलं की, आता समुद्र कसा पार करायचा?

भगवान श्रीरामाचे म्हणणे ऐकून लक्ष्मणजी म्हणाले की, वक्दल्भ्य मुनींकडे या समस्येचे समाधान नक्कीच असणार आहे. ते ब्रह्मांचे जाणकार आहेत, तेच तुमच्या विजयासाठी उपाय नक्की सांगणार. श्री रामजी वाकदल्भ्य ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांना संपूर्ण माहिती त्यांना सांगितली. प्रभू रामाच्या या समस्येवर मात करण्यासाठी मुनीश्रींनी त्यांना माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे व्रत करायचा सल्ला दिला. 

या व्रतासाठी दशमीच्या दिवशी सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा किंवा मातीचा कलश तयार कर, असे वाकडल्भ्य ऋषींनी सांगितलं. तो कलश पाण्याने भरून त्यावर पंच पल्लव ठेवून वेदीवर स्थापित करण्याचा सल्ला दिला. कलशाखाली सात मिश्र धान्ये ठेवा आणि वर बार्ली ठेवा. त्यावर विष्णूची सोन्याची मूर्ती स्थापन करावं. एकादशीच्या दिवशी स्नान करून उदबत्ती, दिवा, नैवेद्य, नारळ इत्यादींनी भगवान श्री हरिची पूजा करा. संपूर्ण दिवस कलशासमोर भक्तिभावाने पूजा करा. 

द्वादशीच्या दिवशी नदी किंवा तलावाच्या काठी स्नान केल्यावर तो कलश ब्राह्मणाला द्या. जर तुम्ही सेनापतींसोबत हे व्रत पाळले तर विजयश्री तुमची नक्कीच निवड करेल, असं ते म्हणाले. श्रीरामांनी विजया एकादशीचे व्रत केलं आणि त्याच्या प्रभावाने त्यांनी राक्षसांवर विजय मिळवलं असं कथेत सांगितलं. ब्रह्माजींनी नारदजींना सांगितले होते की, जो साधक या व्रताचे माहात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्याला वाजपेयी यज्ञाचे फळ मिळतं अशी मान्यता आहे. 

अशी करा पूजाविधी

एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून घरातील देवघराची स्वच्छता करु घ्या. त्यानंतर व्रताचा संकल्प करत श्री हरी विष्णूचा जलाभिषेक करा. पंचामृतासह गंगाजलाने भगवंताला अभिषेक करुन पूजेला सुरुवात करा. देवाला पिवळे चंदन आणि पिवळी फुलं अर्पण करावी. देवा समोर साजूक तुपाचा दिवा लावा. या दिवशी एकादशी व्रताची कथा वाचा. त्यानंतर श्री हरी विष्णू आणि लक्ष्मीजींची आरती करत पुरमेश्वराला तुळशी पत्रासह नैवेद्य अर्पण करा. 

या मंत्राचा जप करा

एकादशीला व्रतासह श्री हरी विष्णूंच्या मंत्र जपाला विशेष महत्त्व असून जीवनातील सुख आणि समृद्धीसाठी 'ओम नारायणाय लक्ष्म्यै नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करणे शुभ मानले जाते.

श्री हरी विष्णूची आरती

ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे।
भक्तजनों के संकट क्षण में दूर करे॥
जो ध्यावै फल पावै, दुख बिनसे मन का।
सुख-संपत्ति घर आवै, कष्ट मिटे तन का॥ ॐ जय…॥
मात-पिता तुम मेरे, शरण गहूं किसकी।
तुम बिनु और न दूजा, आस करूं जिसकी॥ ॐ जय…॥
तुम पूरन परमात्मा, तुम अंतरयामी॥
पारब्रह्म परेमश्वर, तुम सबके स्वामी॥ ॐ जय…॥
तुम करुणा के सागर तुम पालनकर्ता।
मैं मूरख खल कामी, कृपा करो भर्ता॥ ॐ जय…॥
तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति।
किस विधि मिलूं दयामय! तुमको मैं कुमति॥ ॐ जय…॥
दीनबंधु दुखहर्ता, तुम ठाकुर मेरे।
अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे॥ ॐ जय…॥
विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा।
श्रद्धा-भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा॥ ॐ जय…॥
तन-मन-धन और संपत्ति, सब कुछ है तेरा।
तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा॥ ॐ जय…॥
जगदीश्वरजी की आरती जो कोई नर गावे।
कहत शिवानंद स्वामी, मनवांछित फल पावे॥ ॐ जय…॥

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)