कोणत्या दिशेला असावं घराचं दार- खिडक्या? तुम्ही चुकीची दिशा कर नाही निवडली?

दरवाचा उजव्या दिशेनं उघडणारा असावा

Updated: Jun 1, 2022, 08:39 AM IST
कोणत्या दिशेला असावं घराचं दार- खिडक्या? तुम्ही चुकीची दिशा कर नाही निवडली? title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कोणत्याही वास्तूमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी दारं आणि खिडक्या महत्त्वाची भूमिका बजावतात. इथूनच तुमच्या घरात प्रकाशझोत येतो. यामुळेच घराची दारं आणि खिडक्या योग्य दिशेला असणं कधीही फायद्याचं. 

घराच्या दारासाठी उत्तर, पूर्व आणि उत्तर-पूर्व या दिशा फायद्याच्या ठरतात. घरात सकारात्मकता नांदण्यासाठी दारं आणि खिडक्या याच दिशेला असाव्यात. दक्षिण आणि पश्चिम दिशांना मोठ्या खिडक्या नसाव्यात. असल्यास त्यावर मोठे गडद रंगांचे पडदे असावेत. 

असं म्हणतात की, दक्षिण आणि पश्चिम दिशेतून घरात नकारात्मकता येते. हीच नकारात्मकता दूर करण्याचं काम गडद रंगाचे पडदे करतात. खिडक्यांचा आकार आयताकृतीच असावा. कलात्मकतेच्या नावावर इतर कोणत्याही आकाराच्या खिडक्या बनवण्याची चूक करु नका. 

घरातील दारांची संख्या कायम सम असावी. एक लाकडी दरवाजा आणि त्याबाहेर लोखंडी दरवाजा असल्याच ही संख्याही एक, इतकीच मोजावी. एकाच खोलीत दोन दारं असल्यास ती एकमेकांसमोर असतील याची काळजी घ्या. 

दरवाचा उजव्या दिशेनं उघडणारा असावा. दाराच्या चौकटीमध्ये लक्ष्मीची पावलं आणि शुभ- लाभ असे ठसे लावावेत. घरात उत्तर आणि पूर्ण अशा दिशांना खिडक्या असल्यास त्यावर हलक्या रंगांचे पडदे लावावेत. 

घरात सकारात्मकता राहण्यासाठी काही घटक अतीव महत्त्वाचे असतात. या घटकांपैकीच एक म्हणजे दरवाजे आणि खिडक्यांची दिशा. मुळात जर चुकीच्या दिशेला दारं आणि खिडक्या असतील तरीही घाबरुन न जाता त्यावर योग्य ते उपाय करण्याचाही पर्याय तुम्ही तज्ज्ञांच्या सहाय्यानं घेऊ शकता. 

(वरीच माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)