Vastu Tips : तुम्ही घरात कुठे आणि कशी ठेवता औषधं? तुमची 'ही' चूक आजाराला देते निमंत्रण

Vastu Tips : शरीर निरोगी असणं हीच आपली खरी संपत्ती असते. आपण निरोगी असल्यास आयुष्यातील अनेक समस्यांवर मात करतो. पण सततच आजारपण आपलं जीव नकोसा करतो. घरात तुम्ही औषधं कशी आणि कुठे ठेवता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. 

नेहा चौधरी | Updated: Feb 14, 2024, 04:58 PM IST
Vastu Tips : तुम्ही घरात कुठे आणि कशी ठेवता औषधं? तुमची 'ही' चूक आजाराला देते निमंत्रण title=
Vastu Tips in marathi Where and how do you store medicines at home Your this mistake invites disease

Vastu Tips Related to Medicines : आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी शरीर निरोगी राहणं गरजेच आहे. आज प्रत्येक जण आपल्या आरोग्य निरोगी राहावं म्हणून आहारावर भर देतात. शिवाय जीम, योगा करतातत. पण धावपळीचं जग आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे आज असंख्य लोकांना हा ना तो आजाराने ग्रासलंय. अनेक जण वैतागले असतात घरातील एका व्यक्तीनंतर दुसरा सतत कोणी ना कोणी आजारी पडतो. आजारपण आपलं घर काही केल्या सोडत नाही, असा प्रश्न आपल्याला सतावतो. पण कधी हा विचार केला आहे तुमची एक चूक या गोष्टीला कारणभूत असू शकते. हो, तुम्ही घरात औषधं कुठे आणि कशी ठेवतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, असं ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे. (Vastu Tips in marathi Where and how do you store medicines at home Your this mistake invites disease)

घरात औषधं कुठे आणि कशी ठेवावीत याबद्दल आनंद पिंपळकर यांनी मार्गदर्शन केलं आहे. प्रत्येकाला याबद्दल माहिती असं अतिशय महत्त्वाचं आहे. वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. आपली वास्तूशास्त्रसंदर्भातील एक चूक आपलं मोठं नुकसान करतं. चला मग आज आपण वास्तूशास्त्रानुसार औषधांबद्दल जाणून घेऊयात. 

तुम्ही स्वयंपाक घरात औषधं ठेवता?

तुम्ही स्वयंपाक घरात औषधं ठेवत असाल तर आनंद पिंपळकर म्हणतात की, याठिकाणी औषधं ठेवणे अतिशय चुकीचं आहे. घरातील कोणत्याही खोलीच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला बंदीस्त जागेमध्ये आपण औषधं ठेवू शकता. या वास्तूशास्त्रानुसार ईशान्य दिशाला औषधं ठेवल्यास व्यक्ती निरोगी राहतो आणि लवकर बरी होतो असं म्हणतात. 

असं म्हणतात की, एखाद्या गोष्टीला लागून दुसरी गोष्ट येत असते. जसं की, पैशाला लागून पैसे येतात, आनंदाला लागून आनंद येतो, सुखाला लागू सुख येतं. अगदी तसंच औषधाला लागून औषधं येतात. म्हणून औषधं कधीही उघड्यावर ठेवू नये. औषधं हे बंदिस्त ठेवावं. त्याशिवाय औषधं बॉक्समध्ये एक्सपायर डेट गेलेले औषधं कधीही ठेवू नयेत. 

तसंच लिक्विड औषधाच्या अर्धवट बॉटल, ज्यांचा पुन्हा उपयोग होणार नाही अशाही घरातून काढून टाकावे, बऱ्याच जणांना बेडच्या बाजूला औषधं ठेवण्याची सवय असते. तुमची ही चूक महागात पडू शकते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)