मुंबई : चांगल्या जीवनशैलीसाठी नियमितपणे पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. पण अनेकवेळा असं घडतं की, चांगलं अन्न असूनही आरोग्य सतत बिघडतं आणि घरात गरिबी आणि कलह पसरू लागतो. याचं कारण तुमच्या जेवणात नसून तुम्ही ते ज्या कशा पद्धतीने सर्व्ह करता त्यावर अवलंबून आहे.
यासाठीच आज आम्ही तुम्हाला सांगतोय की, चपाती बनवताना कोणत्या चुका नेहमी टाळल्या पाहिजेत, नाहीतर घराची आर्थिक परिस्थिती बिगडायला वेळ लागत नाही.
अनेकवेळा अनवधानाने आपल्याकडून छोट्या-छोट्या चुका आपल्या आयुष्यात मोठा परिणाम करतात. यापैकी एक चूक म्हणजे चपाती चुकीच्या पद्धतीने सर्व्ह करणं. यामुळे आर्थिक विवंचनेसोबतच घरगुती त्रासाचाही प्रश्न कुटुंबात निर्माण होतो.
सनातन धर्मानुसार, जेवण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी तीन पोळ्या देऊ नयेत. असं केल्याने घरातील सुख-शांती भंग पावते आणि नकारात्मक ऊर्जा कुटुंबावर वर्चस्व गाजवते. त्याऐवजी तुम्ही एक किंवा दोन चपात्या सर्व्ह करा.
अनेक वेळा अन्न खाताना ताटातली पोळी संपते. अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीला हातात चपाती देऊ नये. हातात चपाती देऊन सेवा करणं म्हणजे गरिबीला आमंत्रण देणं मानलं जातं. असं मानले जाते की, हातात भाकरी दिल्याने अन्नाचं पुण्यंही संपतं, त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नये.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)