Good Luck Tips for Money : खूप मेहनत करुनही हातात पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. घरात पैसै न टिकण्यामागे आणि बचत न होण्यामागे वास्तु दोष हे प्रमुख कारण असू शकतं. (vastu tips even after a lot of hard work there is no money left follow these surefire measures as per vastu)
वास्तु शास्त्रात धन लाभ होण्यासाठी अनेक उपाय सांगतिले आहेत. वास्तू रचना योग्य असल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. आर्थिक स्थिती उत्तम राहण्यास मदत होते. आम्ही तुम्हाला यशस्वी होण्याचे आणि धन लाभासाठी काही माहिती देणार आहोत.
सनातन धर्माच तुळशीच्या रोपाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आर्थिक चणचणीमागे नकारात्मक उर्जाही कारणीभूत असू शकते. त्यामुळे तुळशीचं रोप लावायला हवं. महत्तवपूर्ण बाब म्हणजे तुलशीचं रोप हे उत्तर किंवा पूर्व दिशेला लावायला हवी. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा वास राहिल.
देवगुरु बृहस्पतिमुळे घरात सुख-समृद्धी येते. जर एखाद्याच्या कुंडलीत बृहस्पति कमकुवत असेल तर त्यांना अनुकूल होण्यासाठी पाण्यात चिमूटभर हळद टाका. यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होते.
मेहनतीनंतरही अपेक्षित यश मिळत नसेल, तर त्यासाठी इशान्य ही उपदिशाही कारणीभूत असू शकते. त्यामुळे इशान्य या उपदिशेत स्वच्छता ठेवायला हवी. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
(Disclaimer : येथे दिलेली संपूर्ण माहिती ही सामान्य गृहतिकांवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)