Vastu Tips: आपल्याला आपल्या नववर्षात चांगली आर्थिक भराभराट व्हावी अशी इच्छा असेलच. तेव्हा आपण नाना तऱ्हेच्या उपायांना जवळ करतो. आपले पैसे हे आपल्याकडेच राहावे म्हणून आणि आपल्याला कुठलीही आर्थिक चणचण भासू नये म्हणून आपण वास्तूशास्त्राचाही (vastu tips for Staying money in pocket) वापर करून घेतो. सध्या अशाच काही वास्तू टीप्स व्हायरल होत आहेत. यामध्ये जर तुम्ही तुमच्या पैशांच्या पाकिटासोबत या पाच वस्तू ठेवल्या तर तुम्हाला आर्थिक त्रासालाही सामोरे जावे लागू शकते. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या गोष्टी कोणत्या आहेत? आपल्या पाकिटात जर का तुम्ही या काही गोष्टी ठेवल्यात तर तुम्हाला नक्कीच त्याचे विपरित (new year vastu tips) परिणाम भोगावे लागू शकतात. परंतु या काही वास्तू टीप्स फोलो कराल तर तुम्हाला पैशांची चणचण अजिबात भासणार नाही उलट तुमच्या खिशात खसखशीत पैसे राहतील. (vastu tips do not put this things on your pocket with money otherwise you may face trouble)
आपल्याकडे क्रिडिट कार्ड, जी पे (Gpay) असे प्रकार असतातच तेव्हा आपल्याला फारशी कॅशची गरज लागत नाही परंतु आपल्याला रोजच्या व्यवहारासाठी पैसे हे लागतातच. आपल्या खिशात नाहीतर पर्स किंवा पॉकेटमध्ये कायमच पैसे असतात. त्यातून आपली पर्स, पॉकेट कायम पैशांनी भरलेलं असावं अशीच आपली इच्छा असते. पण तुम्हाला पर्समध्ये पैशांसोबतच या काही महत्त्वाच्या पाच गोष्टी ठेवताना शंभर वेळा विचार करण्याची आवश्यकता लागणार आहे. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते तेव्हा पैसे पर्समध्ये हे राहतातच. म्हणूनच पर्स घेऊन जाताना 'या' पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
1. वास्तूशास्त्रात असं म्हटलं आहे की तुमची पर्स फाटलेली नसावी. जर तुमच्याकडे फाटलेली पर्स किंवा फाटलेले पॉकेट असेल तर तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे आजचं चेक करा की तुमच्याकडे कुठली फाटलेली पर्स नाही ना नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसलाच म्हणून समजा. तेव्हा आजच तुमचं पाकिट बदला.
2. तुमच्या पर्समध्ये कुठले कागद नाही ना हेही तपासा कारण तुमच्या पर्सचा किंवा पाकिटाचा संबंध कागदाशी नसून पैशांची असतो त्यामुळे कागद ठेवू नका तर त्यात पैसे ठेवा. अनेकजणांना फार वाईट सवय असते की ते जुन्या पावत्या आणि जुनीपुराणी बिलं आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवतात. यामुळे पर्समधील पैसे कमी होण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानूसार जुने कागद, कागदपत्र आणि कुठेलीही रद्दी तुमच्या पर्समध्ये अथवा पाकिटात ठेवू नका.
3. पर्समध्ये पान मसाला ठेवू नका, असं म्हणतात की हे ठेवल्यानेही तुमच्या खिशातील पैसे कमी होऊ शकतात. तेव्हा खाल्लेला पान मसाला किंवा कुठलाही नवीन विकत घेतलेला पान मसाला तुमच्या खिशात अथवा पर्समध्ये ठेवू नका.
4. चॉकलेट किंवा कोणत्याही प्रकाराचे खाद्यपदार्थ पर्समध्ये ठेवू नका. यानेही तुमच्या खिशाला जबर मार लागू शकता. असं म्हणताता यानं पैशांची कमतरता कायम भासते.
5. औषधं, कॅप्सूल, गोळ्या पर्समध्ये ठेवणे देखील पैशासाठी शुभ असते. वास्तुशास्त्रानुसार, ही गोष्ट नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)