मकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे. 

Updated: Dec 20, 2022, 05:02 PM IST
मकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या title=

Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे. त्यामुळे या काळात 12 राशींवर परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला न्यायदेवता म्हणून संबोधलं गेलं आहे. नियमांचं पालन करणाऱ्याला शनि चांगलं फळ देतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि शुक्र हे मित्र ग्रह आहेत. चला जाणून घेऊयात या युतीचा काय परिणाम होईल.

  • मेष- शनि-शुक्राच्या युतीमुळे व्यवसायातील उत्पन्न वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
  • वृषभ- युती काळात या राशीच्या लोकांना सांभाळून राहावं. या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
  • मिथुन- या मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. या काळात उधार दिलेले पैसे अडकण्याची शक्यता आहे.
  • कर्क- जोडीदारासोबत चांगले संबंध ठेवा. आरोग्यविषयक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
  • सिंह- शनि आणि शुक्राची युती तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळून देईल. या काळात धनलाभ होऊ शकतो.

बातमी वाचा- Good Luck: अशोकाच्या पानांच्या तीन उपायांमुळे होईल लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक अडथळा होईल दूर

  • कन्या- ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. आर्थिक अडचण वाढल्याने मानसिक त्रास होईल.
  • तूळ- शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच शनिची उच्च रास आहे. त्यामुळे हा काळ चांगला राहील.
  • वृश्चिक- शुक्र गोचर या राशीच्या लोकांना फायदेशीर ठरेल. प्रवासादरम्यान अडचण येण्याची शक्यता आहे.
  • धनु- या काळात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये समस्या जाणवू शकते.
  • मकर- शुक्र गोचरामुळे परदेश प्रवासाची शक्यता आहे. तसेच महागड्या वस्तू खरेदी करू शकता.
  • कुंभ- आर्थिक अडचण या काळात दूर होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल.
  • मीन- या काळात मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. तसेच अडकलेले पैसे या काळात मिळतील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)