कबुतरांना दाणे खायला देताय? मग 'ही' चूक कधीही करु नका, नाहीतर होईल नुकसान

ज्योतीष शास्त्रानुसार कबुतरांना खायला घातल्यामुळे सुख आणि समुद्धी मिळते. परंतु...

Updated: May 19, 2022, 03:11 PM IST
कबुतरांना दाणे खायला देताय? मग 'ही' चूक कधीही करु नका, नाहीतर होईल नुकसान title=

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती हवी असते. त्यासाठी तो खूप मेहनत देखील करतो. परंतु नशीब सर्वांचीच साथ देईल असं नाही. म्हणून मग लोक यासाठी वेगवेगळे उपाय करतात. परंतु असे असून देखील अपूऱ्या माहितीमुळे लोक असं काही काम करतात, ज्यामुळे त्यांनी केलेला उपाय हा त्यांच्यावरतीच उलटा होतो. ज्यामुळे बरेच लोक विचार करतात की, मी तर सगळं करुन पाहिलं तरी देखील मला का फायदा होत नाही. परंतु यामागे कारणीभूत असतं ती म्हणजे तुमची चुकीची पद्धत.

ज्योतीष शास्त्रानुसार कबुतरांना खायला घातल्यामुळे सुख आणि समुद्धी मिळते. परंतु त्यावेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा, तुमच्या थोड्याशा दुर्लक्षामुळे तुम्हीच तुमच्या आयुष्यात आणखी समस्यांना आमंत्रण देता.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध आणि राहूचा योग असतो, त्याने कधीही छतावर कबुतराला चारा देऊ नये.

राहुचा संबंध घराच्या छताशी आहे आणि कबुतराला खाऊ घालणे हा बुध ग्रहाचा उपाय आहे. कुंडली सोबतच येथे बुध आणि राहू यांचे मिश्रण असेल तर व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसते.

तसेच कबुतरांना कधीही छतावर टाकू नये कारण, कबुतर छतावर बसतात तेव्हा ते छतालाही घाण करतात. यामुळे देखील आपल्या घरावर नकारात्मक परिणाम होतो.

असे म्हणतात की, जेव्हा माणूस कबुतरांना चारा देतो. तेव्हा तो एक प्रकारे देवाचेच काम करत असतो. घरामध्ये कबुतरांना खायला दिल्यास घरात सुख-शांती येते.

कबुतरे घरात धान्य घेण्यासाठी येतात, तेव्हा तुमच्यावर पैशांचा वर्षाव होतो. असेही मानले जाते की कबुतरांना खायला दिल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.