Tuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

10 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Sep 10, 2024, 08:19 AM IST
Tuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ  title=
tuesday panchang 10 September 2024 panchang in marathi ganeshotsav Gauri Avahan

Panchang 10 September 2024 in marathi : बाप्पासोबत आज गौराईचं आगमन होणार आहे. विदर्भात महालक्ष्म्या येतात. गौराईचं वेगवेगळ्या प्रथा पाहिला मिळतात. आज गौराईचं आवाहन असल्याने घरातील महिलांची लगबग सुरु आहे. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, प्रीति योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र वृश्चिक भ्रमण करतोय. (tuesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवार यादिवशी हनुमान आणि गणेशाची उपासना करण्यात येते.  अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 10 September 2024 panchang in marathi ganeshotsav Gauri Avahan) 

पंचांग खास मराठीत! (10 September 2024 panchang marathi)

वार - मंगळवार 
तिथी -  सप्तमी - 23:13:55 पर्यंत
नक्षत्र - अनुराधा - 20:04:24 पर्यंत
करण - गर - 10:39:45 पर्यंत, वणिज - 23:13:55 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - विश्कुम्भ - 24:29:58 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:03:43
सूर्यास्त -18:31:36
चंद्र रास - वृश्चिक
चंद्रोदय - 12:20:59
चंद्रास्त - 22:34:59
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:27:52
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:33:18 पासुन 09:23:09 पर्यंत
कुलिक – 13:32:27 पासुन 14:22:18 पर्यंत
कंटक – 06:53:35 पासुन 07:43:26 पर्यंत
राहु काळ – 15:24:37 पासुन 16:58:06 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:33:18 पासुन 09:23:09 पर्यंत
यमघण्ट – 10:13:01 पासुन 11:02:52 पर्यंत
यमगण्ड – 09:10:42 पासुन 10:44:11 पर्यंत
गुलिक काळ – 12:17:39 पासुन 13:51:08 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:52:44 पासुन 12:42:35 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)