Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?

Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे. 

नेहा चौधरी | Updated: Apr 9, 2023, 10:39 AM IST
Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत? title=
triple navpancham rajyog 30 years 5 zodiac sign get more money

Three Navpancham Yoga in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचराला विशेष महत्त्व आहे. कारण जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंडलीत अनेक बदल घडून येतात. प्रत्येक ग्रहाची खास वैशिष्ट आहेत. जेव्हा ते ग्रह एखाद्या राशीत येतात तेव्हा अनेक वेळा शुभ योग किंवा अशुभ योग तयार होतो. खरं तर त्या योगामुळे काही राशींसाठी तो फलदायक ठरतो तर काही राशींसाठी तो नुकसानदायक ठरतो. 

लवकरच एक खास योग जुळून आला आहे तोही 30 वर्षांनंतर...अपार पैसा आणि भरपूर प्रगती देणारा हा योग आहे नवपंचम योग...मंगळ आणि केतूचा पहिला, केतू आणि शनिचा दुसरा आणि मंगळ आणि शनिचा तिसरा असा दुर्मिळ योग घडून आला आहे. या नवपंचम योगामुळे 5 राशींचं भाग्य उजळणार आहे. (triple navpancham rajyog 30 years 5 zodiac sign get more money) 

मिथुन (Gemini)

नवपंचम योगामुळे आर्थिक संकट दूर नाहीसे होऊन उत्पन्नाचे अनेक स्त्रोत वाढणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास सांगतात. शिवाय शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करणे फलदायी ठरणार आहे. 

धनु (Sagittarius)

नवपंचम योगामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार असून त्यांना धनलाभ होणार आहे. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. नवीन गाडी घेण्याचा योग आहे. 

कुंभ (Aquarius)

नवपंचम योगामुळे या राशीवर पैशांचा पाऊस पडणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात. त्यांच्यानुसार या राशीसाठी हा योग खूप भाग्यशाली आहे. त्यांना वडिलोपार्जित मालमत्ता किंवा संपत्तीतून धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आतापर्यंतच्या कामाचं फळ मिळणार आहे. 

मेष (Aries)

नवपंचम राजयोगामुळे या राशीसाठी आर्थिक फायदा घेऊन आला आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी आर्थिक फायदा होणार आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा योग फलदायी ठरणार आहे. या काळात केलेल्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे. 

कन्या (Virgo)

नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे. ऑफिसमध्ये आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुमचे प्रमोशन आणि पगार वाढ होण्याची शक्यता आहे. मोठ्या कंपनीकडून उच्च पदावरील नोकरीची ऑफर मिळणार आहे. मालमत्तेतून धनलाभ होणार आहे. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)