Vastu Tips: घरातील खोल्यांना द्या 'हे' रंग; गणरायासोबत घरात येईल सुख-समृद्धी

जर तुमच्या घरी पण रंगाचं काम काढणार आहात तर मग वास्तूशास्त्रानुसार घरातील खोल्यांना रंग द्या. 

Updated: Aug 22, 2022, 11:36 AM IST
Vastu Tips: घरातील खोल्यांना द्या 'हे' रंग; गणरायासोबत घरात येईल सुख-समृद्धी title=
trending news vastu tips for home colour which paint is lucky for house walls in marathi

Home Colour Vastu Tips: पुढच्या आठवड्यात घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. गणरायासोबत अनेक घरात गौरीही येते. त्यामुळे घरोघरी गणपती-गौरीच्या आगमनासाठी लगबग पाहायला मिळतं आहे. गणरायचा स्वागतासाठी घरामधील खोल्यांना रंगरंगोटीचं काम करण्यात येतं. 

जर तुमच्या घरी पण रंगाचं काम काढणार आहात तर मग वास्तूशास्त्रानुसार घरातील खोल्यांना रंग द्या. त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात कुठल्या खोलीला कुठला रंग द्यायला हवा. (trending news vastu tips for home colour which paint is lucky for house walls in marathi)

लिव्हिंग रूम आणि डायनिंग रूमसाठी 'हा' रंग द्या

लिव्हिंग रूमला निळा, पांढरा, गुलाबी किंवा हलका हिरवा रंग केल्यास वास्तूनुसार हे शुभ मानलं जातं.  
याशिवाय तुम्ही लिव्हिंग रूमला तपकिरी, हिरवा, पिवळा आणि बेज रंगही देऊ शकता. तर डायनिंग रूममध्ये तुम्ही हलके रंग करू शकता. तर वास्तूनुसार जेवणाच्या खोलीत हलका हिरवा, निळा किंवा गुलाबी रंग असणे शुभ राहील.तर स्वयंपाकघरात पांढरा रंग करून घ्यावा ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.

बेडरूमला कुठला रंग द्यायचा? 

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्येही हलक्या रंगांचा वापर करावा. तुम्ही हिरवा, निळा किंवा गुलाबी रंग वापरू शकता. तर लहान मुलांच्या खोलीत हिरव्या,निळ्या किंवा काळ्या रंग द्यायला हवा. 

अभ्यास आणि देवघराची खोली

काही घरांमध्ये मुलासाठी अभ्यासाठी वेगळी खोली असते. अशावेळी या स्टडी रुमला लाल, गुलाबी, निळा, हिरवा किंवा हलका तपकिरी रंग द्या त्यामुळे खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तर 
देवघराच्या खोलीला लाल, हिरवा, काळा किंवा गुलाबी रंग द्यायला हवा. वास्तूशास्त्रानुसार हे रंग तुमच्यासाठी शुभ फळ देतील. तर बाथरूममध्ये राखाडी, पांढरा आणि  गुलाबी रंग द्यायला पाहिजे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)