Panchang, 29 April 2023 : आज सीता नवमीसोबतच रवि योग; सूर्य आणि शनिला प्रसन्न करण्याचा अद्भूत योग

Panchang, 29 April 2023 : प्रत्येक दिवस नवीन सकाळ घेऊन येतो आणि सोबत काही शुभ अशुभ योगही, अशात तुम्हाला पंचांग मदत करतं. आज सीता नवमीला जाणून घ्या शनिवारचं पंचांग...(Panchang Today)  

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2023, 07:15 AM IST
 Panchang, 29 April 2023 : आज सीता नवमीसोबतच रवि योग; सूर्य आणि शनिला प्रसन्न करण्याचा अद्भूत योग title=
todays panchang Saturday 29 april 2023 Sita Navami 2023 shani dev Ravi Yog astro news in marathi

Panchang, 29 April 2023 : आज शनिवार. आज सीता नवमी (Sita Navami ) त्यासोबतच रवियोग (Ravi Yog) जुळून आला आहे. आज शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व असतो. आज माता सीता पूजेसोबतच शनि (shani dev) आणि सूर्यची पूजा एकत्र होणार आहे. आज दुपारी 12:47 पासून 30 एप्रिल पहाटे 05:05 रवि योग असणार आहे. या योगामध्ये पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. तुमच्या कुंडलीत सूर्य आणि शनि दोष असेल तर आजच्या दिवशी सूर्य आणि शनिदेवाचे उपाय विशेष उपयुक्त ठरतात. (todays panchang Saturday 29 april 2023 Sita Navami 2023 shani dev Ravi Yog astro news in marathi)

चला मग अशा या शुभ दिनाचे शुभ वेळ, अशुभ वेळ, राहुकाल आणि नक्षत्र जाणून घेऊयात. 

आजचं पंचांग खास मराठीत ! (panchang 29 april 2023 in marathi)

आजचा वार - शनिवार

तिथी- अष्टमी

नक्षत्र - पुष्य  

योग - शूल

करण- भाव, बालव 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:12:03 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 07:00:00 वाजता

चंद्रोदय -  13:39:00

चंद्रास्त - 30 एप्रिल - 02:48:00 

चंद्र रास- कर्क - 12:47:41 पर्यंत

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:12:03 पासून 07:03:14 पर्यंत, 07:03:14 पासून 07:54:26 पर्यंत

कुलिक – 07:03:14 पासून 07:54:26 पर्यंत

कंटक – 12:10:26 पासून 13:01:37 पर्यंत

राहु काळ – 09:24:02 पासून 11:00:02 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 13:52:49 पासून 14:44:01 पर्यंत

यमघण्ट – 15:35:13 पासून 16:26:25 पर्यंत

यमगण्ड – 14:12:01 पासून 15:48:01 पर्यंत

गुलिक काळ – 06:12:03 पासून 07:48:02 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:10:26 पासून 13:01:37 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबल 

वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

ताराबल

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

आजचा मंत्र (Mantra)

ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम । 
उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात । 
ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये। 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)