Todays Panchang : शनिदेवाची पूजा करण्यासाठी आज उत्तम संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल

Todays Panchang : आज शनिवार  8 एप्रिल 2023. हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचा दिवस. अशा या शुभ दिनाचं पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल (Aaj Ka Panchang 8 April 2023)

नेहा चौधरी | Updated: Apr 8, 2023, 06:44 AM IST
Todays Panchang : शनिदेवाची पूजा करण्यासाठी आज उत्तम संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल title=
todays panchang 08 april 2023 Saturday tithi shubh mahurat rahu kaal maharashtra mumbai astro news in marathi

Todays Panchang in marathi : आज शनिवार. हिंदू धर्मात धार्मिक कार्याच्या दृष्टीकोनातून शनिवार हा विशेष मानला जातो. आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी आहे. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा विशेष देवासाठी समर्पित केला गेला आहे. शनिवार हा हनुमानजींना प्रसन्न करण्याचा दिवस. नुकतीच हनुमान जयंती झाली आहे. जर तुम्हाला त्या दिवशी मंदिरात काही कारणाने जाता आलं नसेल तर आज नक्की जा. शिवाय शनिदेवाला प्रसन्न करण्याचा आजचा उत्तम संयोग आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी जाणून घ्या पंचांगानुसार मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल. 

आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 08 april 2023 in marathi)

आजचा वार - शनिवार

तिथी- द्वितीया

नक्षत्र - स्वाति

पक्ष - कृष्ण

योग - वज्र

करण- गर - 10:13:13 पर्यंत, वणिज - 21:58:38 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:27:15 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.54:02 वाजता

चंद्रोदय -  रात्री 09:00:00
चंद्रास्त -  संध्याकाळी 07:43:00

चंद्र रास - तुळ

ऋतू - वसंत   

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त – 06:27:15 पासून 07:17:03 पर्यंत, 07:17:03 पासून 08:06:50 पर्यंत

कुलिक – 07:17:03 पासून 08:06:50 पर्यंत

कंटक – 12:15:45 पासून 13:05:32 पर्यंत

राहु काळ – 09:33:57 पासून 11:07:18 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 13:55:19 पासून 14:45:06 पर्यंत

यमघण्ट – 15:34:53 पासून 16:24:40 पर्यंत

यमगण्ड – 14:13:59 पासून 15:47:20 पर्यंत

गुलिक काळ –  06:27:15 पासून 08:00:36 पर्यंत

दिशा शूळ - उत्तर 

आजचा मंत्र 

"प्रां प्रीं प्रौं सह शनैइशराय नमः"

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)