Horoscope 8 April 2023 : आज 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, हनुमानजी आणि शनिदेवा मिळेल आशीर्वाद

Daily Rashi Bhavishya In Marathi : आज शनिवार..म्हणजे दोन दिवस आरामाचे..अशातही जर तुमचा दिवस कसा जाईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य...

नेहा चौधरी | Updated: Apr 8, 2023, 06:13 AM IST
 Horoscope 8 April 2023 : आज 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, हनुमानजी आणि शनिदेवा मिळेल आशीर्वाद title=
horoscope today daily rashi bhavishya 8 April 2023 horoscope astrology in marathi

Horoscope 8 April 2023 in marathi : कधी आनंद तर कधी संकट...अधिक अपार पैसा तर कधी आर्थिक अडचण...संमिश्र दिवस आपण जगत असतो. अशावेळी अनेक वेळा आपल्याला चिंता असते की आजचा दिवस आपला कसा असेल. काही अचडणी तर येणार नाही ना. शनिवार हा संकटमोचन हनुमानजीची वार असतो. त्याशिवाय शनिदेवालाही आपण आज प्रसन्न करतो. तर चला आजचा शनिवार 8 एप्रिल 2023 आपल्यासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य (horoscope today daily rashi bhavishya 8 April 2023 horoscope astrology in marathi)

मेष (Aries)

कुठला मालमत्तेचा वाद सुरु असल्यास तो मार्गी लागेल. घरातील स्त्रीमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. त्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी बढतीची संधी आहे. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांनी आज रागावर नियंत्रण ठेवणं योग्य राहिल अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मालमत्तेमध्ये गुंतवणूक फायदेशी राहिल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुटुंब आणि जुन्या मित्रमैत्रीणीसोबत आनंदात जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची दिसून येईल. 

सिंह (Leo)

आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्ह आहेत. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभ घेऊन आला आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. मात्र जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांनी आज मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे. कामामध्ये तुमचा आज उत्साह दिसून येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण असणार आहेत. 

वृश्चिक (Scorpio)

या राशीसाठी आजचा दिवस जरा कठीण असणार आहे. कुठल्या तरी कारणामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरदारांसाठी दिवस चांगला असणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांनी जर कामासाठी काही योजना आखल्या असतील तर त्यात यश मिळले. आज जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. मात्र काही कारणामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. शिवाय रागावर नियंत्रणही ठेवा, अन्यथा कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी तुमचासाठी चांगला जाणार आहे. कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. वडिलधारांकडून आर्थिकलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्याची काळजी घ्या. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. मानसिक त्रास कमी होईल, मात्र तरीही रागावर नियंत्रण ठेवा. दैनंदिन कामात तुम्हाला आज यश मिळेल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)