मेष- अडकलेली कामं पूर्ण होतील. नात्यांमध्ये चांगला काळ येईल. स्वत:ची प्रतिमा आणखी चांगली करण्याच्या दिशेने पावलं उचलाल. दिवस उत्साही असेल. कौटुंबीक कामांमध्ये व्यग्र राहाल. जुने आजार दूर होतील.
वृषभ- कामात व्यग्र असाल. नोकरीच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनतीने अर्थार्जन कराल. काळ चांगला आहे. एकाच वेळी विविध क्षेत्रांमध्ये व्यग्र असाल. पुढे जाण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. प्रवासाचा योग आहे.
मिथुन- घाईने कोणतंही काम करु नका. पैसे जपून वापरा, वायफळ खर्च होऊ शकतात. नोकरी आणि व्यापारात अडचणी वाढतील. आरोग्याविषयी निष्काळजीपणा नको. मित्र आणि कुटुंबाच्या व्यापात अडकलेले असाल. पोटाचे विकार होऊ शकतात.
कर्क- नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येतील. दैनंदिन कामांमध्येची अडचणींची शक्यता आहे. हट्टाला पेटलात तर मतभेद होण्याची शक्यता आहे. जास्त विचार करण्यात वेळ दवडू नका. अडचणी वाढतील.
सिंह- कुटुंबात सुख- शांती असेल. कामाच्या ठिकाणी नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामांमध्ये यश मिळेल. तुमचं लक्ष कोणा एका दुसऱ्या गोष्टीवर असेल. नोकरीच्या ठिकाणी कोणीतरही व्यक्ती नकळतपणे तुमची मदत करत असेल. आर्थिकदृष्ट्या साथीदाराची मदत होईल.
कन्या- व्यवसाय वाढेल. कनिष्ठांकडून मदत मिळेल. काही खास व्यक्तींना भेटण्याचा योग. दैनंदिन कामांतून काही वेळासाठी उसंत मिळेल. अपूर्म कामं पूर्णत्वास जातील. तुम्हाला त्याचा फायदा होईल.
तुळ- नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. दिवस चांगला आहे. प्रगती आणि फायद्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. नशीबाची साथ असेल. कोणालाही न दुखावता चतुराईने काम करा.
वृश्चिक- व्यापारात फायदा कमी होईल. बदलीची शक्यता आहे. नवं काही सुरू करण्यावर भर द्या. दिवस आव्हानात्मक असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. समाज आणि कुटुंबात तुमचं महत्त्वं वाढेल. तब्येतीत चढउतार होऊ शकतात. जेवणात मसालेदार पदार्थ टाळा.
धनु- दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. विचारपूर्वक निर्णय घेण्याचा फायदा होईल. समाज आणि कुटुंबात महत्त्व मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. साथीदारासोबतच चांगला काळ व्यतीत कराल.
मकर- नवे करार आज करु नका. पैसे अडकण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात ठीक असेल. कुटुंबातीलच सदस्य तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. काही बेत आखत असाल तर ते सध्या कोणाला सांगू नका. जेवणाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
कुंभ- आर्थिक चणचण संपेल. येणारे पैसे आणि होणारा खर्च संतुलित असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. पूर्ण ताकदीने कामं पूर्णत्वास न्याल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांची सोबत फायग्याची ठरेल. प्रयत्नांनी अडचणींवर तोडगा काढाल. कोणत्यातरी खास निकालाच्या प्रतीक्षेत आहात. संयम धेवा, धीर राखा आनंदच मिळेल.
मीन- व्यापार न वाढवण्याचा निर्णय चांगला ठरेल. जे चाललं आहे ते तसंच चालूद्या. महाग वत्सूंची खरेदी कराल. आज कोणताही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. प्रेम, नात्यांच्या बाबतीत दिवस चांगला आहे.