आजचे राशीभविष्य | गुरूवार | 14 फेब्रुवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 14, 2019, 08:26 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरूवार | 14 फेब्रुवारी 2019 title=

मेष : मित्र आणि भावांकडून सहकार्य मिळेल. नव्या कामांना सुरूवात होईल आणि ठरवलेली कामे पूर्ण होतील. संपत्तीच्या कामांवर लक्ष द्या. तुमचा पराक्रम वाढेल. व्यवहारात चांगले यश मिळण्याचे योग आहेत. तुमचा दिवस परिवार, वैयक्तिक आयुष्य आणि पैशांच्या प्रकरणात व्यतित होऊ शकतो. महत्त्वाच्या कामांच्या योजना बनवू शकता. आपल्या जबाबदारीवर लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ : कोणत्या नकारात्मक गोष्टीत अडकलात तर महत्त्वाची गोष्ट तुम्ही गमावू शकता. आज तुम्ही कोणता निर्णय घेऊ नका, कोणता निष्कर्षही काढू नका. स्वभावात चंचलतेमुळे थोड्या अडचणी येऊ शकतात.  आज दिवसभर सावधानी बाळगा. विचार करुनच बोला. आज तुम्ही दुसऱ्यांचे बोलणे पूर्ण ऐकून घ्या. जोडीदारासोबत गाडी चालवताना सावधान राहा. आरोग्य ठिक ठाक राहील. चांगले जेवण मिळेल. 

मिथून : नवे काम आणि नवा व्यवसाय करण्याची संधी येऊ शकते. ताणातून मुक्त होण्यासाठी दिवस चांगला असेल. कोणती नवी ऑफर मिळू शकते. ठरवलेल्या कामांना सुरूवात करा. तुमची कामे लवकरच पूर्ण होतील. रोजच्या कामात काही अडथळे येणार नाहीत. महत्त्वाच्या मिटींग आणि कामासाठी दिवस चांगला राहील. समस्या लवकर दूर होतील. 

कर्क : लव लाईफमध्ये गैरसमज होतील. कोणत्याही प्रकरणात निष्काळजीपण करु नका. नोकरी किंवा व्यवसायात निष्काळजीपणा किंवा घाई करु नका. विचार केलेली कामे पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. आज कोणतेही काम करताना जास्त मेहनत करावी लागेल. कर्क राशीच्या लोकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

सिंह : आज तुमची ठरवलेली कामे पूर्ण होणार नाहीत. अनेक प्रकारच्या विचारात तुम्ही अडकू शकता. आज पैसे संभाळून ठेवा. घेण्या-देण्याच्या आणि गुंतवणकीच्या बाबतीत विचार करा. मनात कोणती तरी समस्या आणि काळजी राहील. कडू गोष्टी करु नका. आज कोणता प्लान बनवू नका. संभाळून राहा. कामात मन न लागल्याने त्रास वाढू शकतो. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला असेल. 

कन्या : व्यवसायात काही नवी योजनांवर काम सुरु होईल. जोडीदाराची मदत मिळेल. लव लाईफसाठी दिवस चांगला राहील. आज ठरवलेली काही कामे पूर्ण होतील. महत्त्वाच्या लोकांशी तुमच्या भेटी होतील. आज तुमच्या कामावर लक्ष द्या. अर्धवट राहीलेली कामे पूर्ण करा. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि मनही प्रसन्न राहील. 

तूळ : दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही परिस्थीतीचा फायदा उठवून काम पूर्ण करु शकाल. कामकाजातही तुमचे मन लागेल. आज तुम्हाला अचानक काही चांगल्या संधी मिळतील. अचानक मनात बदल होतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतच्या संबंधात मधुरता येईल. जोडीदाराकडून सरप्राईज मिळण्याचे योग आहेत. तुमचे आरोग्य चांगले राहील. 

वृश्चिक : नोकरी आणि व्यवसायात अचानक काही निर्णय घ्यावे लागतील. नुकसान देखील होऊ शकते. गोंधळ वाढू शकतील. कोणत्या अनपेक्षित नुकसानासाठी तयार राहा. कामाच्या ठिकाणी त्रास आणि असुविधा जाणवेल. त्रास देणारे लोक तुमच्या आजुबाजूलाच असतील. आवडत नसून देखील दोन्ही बाजूने बोलावे लागेल. आरोग्यात उतार चढाव होतील. 

धनू : आर्थिक प्रकरणे मार्गी लागतील. वैवाहीक आयुष्य सुखद होई. तुम्ही समजदारी आणि विनम्रतेने प्रकरणे मिटवू शकता. नेहमीच्या कामात धनलाभ होऊ शकतो. कर्ज घेण्याचे मन होऊ शकते. तुमच्या मोठ्या अडचणी दूर होऊ शकतील. मुलांकडून मदत मिळेल. नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. नोकरी धंद्यातील अडचणी दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावधान राहावे लागेल. 

मकर : आज तुम्हाला दिवसभर सावधान राहावे लागेल. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासमोर अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील. सतर्क राहा. तुमच्या मनात गोंधळ होईल. जुन्या गोष्टीत आज अडकून राहाल. कोणत्या समस्येचे निराकारण सहजासहजी होणार नाही. काही खास कामे आज अर्धवट राहतील. कामात आपले मन लागणार नाही. व्यवसायात करार आता नाही केलात तरच चांगले राहील. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला राहील. 

कुंभ : ऑफिसमध्ये स्वत:वर नियंत्रण ठेवा. पदोन्नती होण्याची संधी आहे. कार्यक्षेत्रातील ताण कमी होऊ शकतो. आज तुमच्या योजना यशस्वी होतील. पुढच्या कामाचे प्लानिंग बनवणे आज तुमच्यासाठी सोपे होईल. अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. योग्यता आणि अनुभवावरून तुम्हाला काम मिळेल. तुमच्या समस्यांचे निराकारण होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत संभाळून राहा. रक्ताचे आजार होण्याची शक्यता आहे. 

मीन : व्यवसायात काही नवे करण्याच्या भानगडीत तुमच्या अडचणी वाढतील. मनामध्ये आज जी उलथापालथ सुरू आहे त्यामुळे कामात मन लागणार नाही. आज तुम्ही नोकरी आणि व्यवसायात घाई करु नका. जोखिम घेण्यापासून वाचा. कोणत्या तरी घटनेमुळे तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात अडचणी वाढतील. केल्या गेलेल्या कामांचा निकाल न मिळाल्याने त्रास होईल. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला नाही आहे. जेवण वेळेवर करा.