आजचे राशिभविष्य | शुक्रवार | 18 जानेवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jan 18, 2019, 07:52 AM IST
आजचे राशिभविष्य | शुक्रवार | 18 जानेवारी 2019  title=

मेष : तुमचे व्यक्तित्व आकर्षक राहील. मन देखील मजबूत राहील. घर, जमीन-जागा संबंधित काही चांगल्या आणि नव्या संधी तुम्हाला मिळू शकतात. ऑफिमधल्या काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यात वेळ जाईल. तुमच्या मनातील शंका दूर होतील. जे बदल होत आहेत ते तुमच्या प्रगतीसाठी आहेत. परिवार आणि समाजातील लोक तुम्हाला मदत करतील.

वृषभ : आज कामामध्ये सातत्य आणि काळजी घेतलात तर यश मिळेल. ठरवलेली कामे सहज पूर्ण होतील. आज तुम्ही येणाऱ्या दिवसांची योजना आखाल. कोणत्या खास व्यक्तीशी तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी शेअर कराल. काही मोठे निर्णयही तुम्ही घेऊ शकता. आईकडून प्रेम मिळेल. व्यवसाय वाढेल. 

मिथुन : संभ्रमातील स्थितीतून बाहेर पडण्यात यशस्वी व्हाल. धीर आणि प्रयत्नांचे संतुलन राखाल तर समस्या लवकर सुटतील. धन लाभ होण्याचे योग आहेत. कोणत्या तरी एका व्यक्ती सोबतची भांडण मिटू शकतात. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावर खुष असतील. नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. 

कर्क : चिंता मिटेल. कोणत्या तरी नव्या पद्धतीमुळे तुमचे काम सोपे होईल. कोणते तरी नवे उपकरण देखील आज तुम्ही खरेदी करु शकता. कोणत्या तरी नव्या विचारावर काम करु शकता. नवीन विचार, नवी टेक्निक तुम्हाला फायदेशीर ठरु शकेल. व्यवसाय आणि परिवारात सहाकार्याने तुम्हाला यश मिळेल. नव्या व्यवसायाला सुरूवात होईल. प्रेमामध्ये यश मिळण्याचे योग आहेत. 

सिंह : तुमच्या मनात काही नवे विचार येऊ शकतात. विश्वासातील मंडळींशी वेळेवरच सल्ला घ्या तरच मदत मिळू शकेल. तुम्ही तुमची प्रतिभा दाखवण्यात यशस्वी व्हाल. वाचन आणि काही नवे शिकण्यात रस दाखवाल. व्यवसाय किंवा नोकरीमुळे प्रवास करण्याचे योग येतील. संयम ठेवा आणि स्वत:साठी काही चांगली कामे देखील होतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. 

कन्या : करियरमध्ये बदल होण्याच्या दृष्टीने वेळ ठिक चालला आहे असं म्हणता येईल. थेट पण थोडक्यात बोलण्याने अडचणींपासून वाचाल. मित्र आणि नातेवाईकांची मदत मिळेल. धान लाभ होण्याचा योग आहे. केलेल्या कामांचा फायदा मिळेल. संबंधामध्ये सुधार होण्याचा योग आहे. प्रोफशनमध्ये यश मिळू शकते. विवाह योग्य लोकांना प्रस्ताव मिळतील. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी सोबतच्यांचा सल्ला घ्या. 

तुळ : अविवाहीत लोकांचे प्रेम आयुष्य चांगले असेल. लग्न झालेल्यांना जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराशी आपले संबंध आणखी गोड होतील. कामामध्ये काही लोकांची मदत मिळेल. फिरणे आणि मनोरंजनात वेळ जाईल. आज कोणती तरी चांगली बातमी देखील मिळू शकते. व्यवसायात व्यस्तता वाढू शकते. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. काही नवे शिकण्याची संधी आहे. कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील. 

वृश्चिक : मेहनतीने काम कराल आणि चांगला फायदा होईल. कोणाशी तरी चांगली बोलणी होतील ज्याचा फायदा करियरमध्ये तुम्हाला नक्की होईल. सोबत काम करणाऱ्या व्यक्ती, तुमच्या करियरमध्ये तुम्हाला मदत करतील. आज तुम्ही आनंदीत असाल. मोठी कामे संयमाने करा. ज्या पद्धतीने तुम्ही बोलाल त्यामुळे दुसरे लोक तुमच्यावर प्रभावित होतील. 

धनु : तुमच्या मनातील गोष्ट कोणाला सांगायची असेल तर सांगून टाका. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीवर काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमच्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. कोणतेतरी रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायासाठी नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. जोडीदाराकडून सन्मान मिळेल. 

मकर : कोणती तरी मोठी समस्या पैशांमुळे सुटू शकते. कमावण्याचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. आज काम जास्त असेल. बॉसला काही गोष्टी पटवून देण्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला फायदा मिळेल. जोडीदारांची मदत मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे आरोग्य चांगले राहील. रोजची कामे देखील पूर्ण होतील. 

कुंभ : नोकरी आणि व्यवसाय करणारे लोक तुमच्या कामाने संतुष्ट होतील. मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलणी होतील. कोणाची तरी मदत करण्याचा योग आहे. विरोधकांवर यश मिळवाल. आज तुम्हाला संबंधांचा फायदा मिळेल. मुलांचे सुख मिळेल. व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाशी खुश असतील. पती-पत्नीमध्ये समजदारी दिसेल. आई वडीलांचे आशीर्वाद घ्याल. 

मीन : धन लाभ होण्याची मोठी संधी आहे. पैशांच्या क्षेत्रात तुम्हाला चांगला सुधार पाहायला मिळेल. काही क्षणांचा फायदा मिळू शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक सल्ल्यानुसारच करा. आजुबाजूचे लोक किंवा सोबत काम करणाऱ्यांचे कौतूक करा. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. आनंद मिळेल. कुठून तरी कोणती चांगली बातमी मिळेल. काम धंदा व्यवस्थित चालेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील.