Horoscope Today 15 June : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष- नोकरी बदलण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक स्थैर्य ठेवा. नव्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
वृषभ- नोकरीच्या ठिकाणी मन लावून काम करा. सहकाऱ्यांशी ईर्ष्या करू नका. रोगमुक्त होण्याची संधी तुम्हाला मिळणार. मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल.
मिथुन- एखाद्या नव्या गोष्टीची माहिती मिळवून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. शरीरात वेदना होऊ शकतात. आराम करा.
कर्क- एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल. मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
सिंह - नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळणार आहे. अती क्रोध करु नका. संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येणार आहे.
कन्या- विवाहयोग आहे. आज एखादं चांगलं स्थळ तुमच्यापर्यंत येणार आहे. कुटुंबीयांसोबत राहा. आर्थिक लाभ होणार आहे.
तुळ- कोणतीही अडचण असल्यास कुटुंबीयांशी संपर्क साधा. पोटविकार उदभवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक - सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हा. काही नव्यानं ओळख झालेल्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.
धनु- आज कुटुंबाच्या नजरेत तुम्हाला मानाचं स्थान मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची संधी आहे. आर्थिक लाभ होणार आहे.
मकर - पती पत्नीमध्ये लहानसा वाद होण्याची शक्यता आहे. पण हा वाद फार काळ टिकणार नाही. एकमेकांना समजून दाखवण्याची तयारी दाखवा.
कुंभ- व्यवसायात नफा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मीन - व्यापाऱ्यांना नफा मिळणार आहे. आपआपसांत ताळमेळ साधत पुढे जा. फायदा तुमचाच आहे. समोर आलेल्या संधीचं सोनं करा.