Tulsi Puja : तुळशीपूजनाच्या वेळी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, माता लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज

तुळशीला पाणी देण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे चांगले मानले जाते.

Updated: Jun 14, 2022, 07:38 PM IST
Tulsi Puja : तुळशीपूजनाच्या वेळी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, माता लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज  title=

मुंबई : तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान देण्यात आले आहे. यामुळेच बहुतेक घरांमध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते. तसेच तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदात देखील तुळशीला महत्व आहे. वास्तुशास्त्र देखील आपल्याला तुळशीबद्दल बरंच काही सांगतं, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होतो. तुळशीबद्दल अशीही धार्मिक धारणा आहे की, त्यात मां लक्ष्मी वास करते. असे मानले जाते की, दररोज तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सुख-समृद्धी राहाते.

तुळशीच्या पावित्र्यामुळे त्याची पाने देवाला अर्पण करण्यासाठी वापरली जातात, असे सांगितले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार सकाळी नियमितपणे तुळशीची पूजा केल्यानंतर त्यात पाणी द्यावे. तुळशीला पाणी देण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे चांगले मानले जाते.

असे मानले जाते की, संध्याकाळच्या पूजेनंतर तुळशीच्या खाली तुपाचा, तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे म्हटले जाते की रोज असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो.

रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी देऊ नये असे सांगितले जाते. या दिवशी तुळशीला पाणी दिल्याने देवी लक्ष्मी आणि विष्णूचा कोप होतो, असे मानले जाते. याशिवाय या तुळशीची पानेही तोडली जात नाहीत.

धार्मिक मान्यतेनुसार रोज तुळशीची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. त्याचवेळी त्याच्या कृपेने, धान्य आणि वैभवात वाढ होते. तुळशीची पूजा केल्यानंतर शेवटी आरती वाचणे शुभ मानले जाते.