Surya Gochar 2023 : पंचांगानुसार 16 ऑगस्टला अधिक मासातील अमावस्येला आहे. त्यानंतर अधिक महिना संपणार आहे आणि 18 ऑगस्टला खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना काही राशींना मालामाल करणार आहे. 18 ऑगस्ट रोजी पहाटे 3.57 वाजता सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत गोचर करणार आहे. तब्बल एक वर्षांनंतर सूर्य गोचरमुळे काही राशींचं नशीब चमकणार असून ते श्रीमंत होणार आहेत. (surya gochar 2023 august 18 Budhaditya Rajyog these zodiac signs sun transit will get profits pockets full of money)
सूर्याचा सिंह राशीत गोचर या राशीच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. या राशीच्या पाचव्या घरात बुधादित्य योग निर्माण होतोय. कुंडलीतील पाचवं घर हे शिक्षण, बुद्धिमत्ता आणि नोकरीचं असल्याने या लोकांना या क्षेत्रात चांगले परिणाम दिसणार आहे. आर्थिक क्षेत्रात आनंदाची बातमी मिळणार आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. नातेसंबंध आणखी मजबूत होणार आहे.
या राशीत सूर्य गोचरमुळे बुधादित्य योग जुळून येतो आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या मजबूत होणार आहात. उत्पन्न वाढ होणार असून आर्थिक क्षेत्रात मजबूती मिळवणार आहात. समाजात मान-सन्मानही वाढणार आहे. वैवाहिक जीवन आनंद असेल.
या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. नोकरीतही बढती मिळणार आहे. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदी आनंद असणार आहे. मात्र उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्याचाच फायदा होणार आहे.
या राशीच्या लोकांना महिनाभर नशीबाची उत्तम साथ मिळणार आहे. परदेशवारीचे योग आहेत. पैसे कमविण्याची नवीन संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. घरातील शुभ ठरणार आहे. रिअल इस्टेट आणि वाहन खरेदीसाठी हा काळ उत्तम असणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांच्या सातव्या घरात सूर्य ग्रह बुधादित्य योग निर्माण होणार आहे. कुंडलीतील सप्तम घर हे नोकरी आणि पत्नीचं स्थान आहे. त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन आनंदात असणार आहे. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरदारांची पदोन्नतीचा योग आहे.