ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवांना किती वेळा अर्घ्य द्यावा? जाणून घ्या नियम

Surya Dev Arghya Niyam: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवीदेवतांना समर्पित आहे. प्रत्येक वारानुसार देव आणि ग्रहांची पूजा केली जाते. वारानुसार रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. नववर्षांची सुरुवात रविवारपासून होणार आहे. सूर्यदेव धनु राशीत आहे आणि 15 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत. 

Updated: Dec 28, 2022, 04:03 PM IST
ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवांना किती वेळा अर्घ्य द्यावा? जाणून घ्या नियम title=

Surya Dev Arghya Niyam: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवीदेवतांना समर्पित आहे. प्रत्येक वारानुसार देव आणि ग्रहांची पूजा केली जाते. वारानुसार रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. नववर्षांची सुरुवात रविवारपासून होणार आहे. सूर्यदेव धनु राशीत आहे आणि 15 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी नविन वर्षाची सुरुवात सूर्यदेवांची आराधनेनं करू शकता. वर्षभर सूर्यदेवांची कृपा मिळवण्यासाठी विधीपूर्वक पूजा करता येईल. सूर्यदेव अर्घ्य दिल्याने प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवांची पूजा केल्याने पुण्य मिळतं. सकाळी सूर्यदेवांना नमस्कार करून जल अर्पण करावं. सूर्यदेवांच्या कृपेमुळे समाजात मान-सन्मान वाढतो. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. चला जाणून सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचा विधी आणि मंत्र

अशा पद्धतीने कराल पूजा

धार्मिक ग्रंथानुसार सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण आवश्यक आहे. तांब्यात पाणी घेऊन त्यात सिंदूर, अक्षता, कुंकू आणि लाल फुल टाकावं. सूर्याला अर्घ्य देताना पूर्वेकडे तोंड करावं. दोन्ही हात डोक्यावर नेऊन वरून पाण्याची धार सोडावी. पाण्याच्या धारेतून सूर्याच प्रकाश पाहावा. पाणी कुंडी किंवा भांड्यात अर्पित करू शकता. अर्घ्य देताना पाण्याचे शिंतोडे पायावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासोबत सूर्यमंत्र जपावा. 

शास्त्रानुसार सूर्यदेवांना तीनवेळा अर्घ्य द्यावं. पहिल्यांदा अर्घ्य दिल्यानंतर एक परिक्रमा करावी. त्यानंतर दुसऱ्यांदा अर्घ्य देऊन परिक्रमा करावी. तिसऱ्यांदा अर्घ्य देऊन पुन्हा एकदा परिक्रमा करावी. असं करताना पुढील मंत्राचा उच्चार करावा. 

  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
  • ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर
  • ऊं ब्रह्म स्वरुपिणे सूर्य नारायणे नमः

बातमी वाचा- Lucky Women: पायावर अशा खुणा असलेल्या महिला असतात नशिबवान, काय सांगतं सामुद्रिक शास्त्र जाणून घ्या

सूर्यदेवांच्या बारा नावांचा जप करावा

1. ॐ सूर्याय नम:
2. ॐ मित्राय नम:
3. ॐ रवये नम:
4. ॐ भानवे नम:
5. ॐ खगाय नम:
6. ॐ पूष्णे नम:
7. ॐ हिरण्यगर्भाय नम:
8. ॐ मारीचाय नम:
9. ॐ आदित्याय नम:
10. ॐ सावित्रे नम:
11. ॐ अर्काय नम:
12. ॐ भास्कराय नम:

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)