राशीभविष्य १२ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

काय म्हणतेय तुमची रास 

Updated: Jan 12, 2020, 08:04 AM IST
राशीभविष्य १२ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा title=

मेष- काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त घ्यावी लागेल. दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न कराल. पण विचार करून निर्णय घ्या. घाईत निर्णय घेवू नका. नुकसान होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

वृषभ- व्यवसायात अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नत्ती होण्याची शक्यता आहे. सहकार्यांकडून आणि साथीदाराकडून मदत मिळेल. अविवाहित लोकांची लव्ह लाईफ चांगली राहिल. पगार वाढीची शक्यता आहे. 

मिथुन- कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यापार आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करा. प्रतीपथावर वाटचाल कराल. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. साथीदाराकडून आर्थिक मदत मिळेल.  

कर्क- कामाच्या ठिकाणी सर्वांना प्रभावित कराल. नोकरी बदलण्याच्या आणि अधिक उत्पन्नाची तरतूद कराल. नशीबाची साथ मिळू शकेल. नवीन सुरूवात देखील करू शकता. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवे सौदे होवू शकतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. 

सिंह- कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कदाचित मदत मिळू शकते. व्यवसात सावधानता बाळगा. व्यवसायात वरिष्ठांकडून सल्ला घ्या. राहिलेली कामे पूर्ण करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. साथीदारासोबत प्रवास होवू शकतो. 

कन्या- नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत मोठे निर्णय घ्याल. आर्थित स्थिती सुधारू शकते. साथीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. प्रेमी युगूलांसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या व्यक्तींसोबत भेट होण्याची शक्यता आहे. 

तुळ- अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या विरोधात असतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष केंद्रीत करा. साथीदाराकडून मदत आणि समर्थन मिळेल. विवाहासाठी प्रस्ताव येवू शकतात. विवाहितांसाठी दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.  

वृश्चिक ­ व्यवसाय चांगला चालेल. तुमचं एखादं अतिशय महत्त्वाचं काम पूर्ण होईल. आरोग्य उत्तम असेल. व्यक्तिगत प्रश्न निकाली निघतील. गुंतवणूकीच्या योजना आखाल. साथीदाराकडून मदत आणि समर्थन मिळेल. 

धनु- परिवारामध्ये सुखशांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणत्या चांगल्या मित्राशी ओळख होण्याचे योग आहेत. अविवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे. 

मकर- व्यापार आणि नेकरीमध्ये चांगल्या गोष्टी घडतील. महत्त्वाच्या विषयावर कुटुंबात चर्चा होईल. ऑफिसच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. काही नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर घ्याव्या लागतील. गुंतवणूक करण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.

कुंभ- जूनं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. दुऱ्यांना मदत केल्याचा आनंद आणि फळ मिळेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसच्या कामांमध्ये मदत मिळेल. 

मीन- अचानक फायदा होईल. साथीदाराकडून आर्थिक मदत मिळाली तर धन लाभ होवू शकतो. जूने कर्ज मार्गी लागतील. वायफळ खर्चांवर आवर घाला. ऑफिसमध्ये नव्या कामाची जबाबदारी मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे.