मुंबई : 12 राशींवर अनेकांचा दिवस अवलंबून असतो. या राशी नक्षत्रांवर अवलंबून असतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर ग्रह आणि नक्षत्रांचा खूप परिणाम होत असतो. ग्रह आपली दिशा दररोज बदलत असतात ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर असतो.
मेष - आजच्या दिवसाची सुरूवात नव्या विचारांनी कराल. पण जर तुमचे काही महत्वाचे निर्णय असतील तर ते आजच्या दिवशी घ्याल. कामात लक्ष केंद्रीत करणं महत्वाचं आहे. कुटुंबासोबत थोडा दूरावा निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ - आजचा दिवस उत्तम असेल. शनिवार असल्यामुळे कामाची फार दगदग नसेल. आज थोडा आराम जाणवेल. कुटुंबासोबत बेत आखाल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. चांगले दिवस यायला सुरूवात झाली आहे त्यामुळे मन प्रसन्न राहिल.
मिथुन - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नवीन खरेदीचे व्यवहार कराल. पैशांचे व्यवहार होत असल्यामुळे थोडा तणाव असेल पण मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्लान कराल. पुढील काही दिवस यामध्येच जातील.
कर्क - तुम्ही आजच्या दिवसाची सुरूवात नव्या संकल्पाने कराल. शरिराकडे विशेष लक्ष द्या. वर्षाचा पहिला महिना हा उत्तमच आहे. नवीन काही गोष्टी शिकाल यामुळे तुम्हाला प्रेरणादायी वाटेल. मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. शारिरीक स्वास्थ जाणवेल.
सिंह - आज तुम्हाला स्वतःला आजचा दिवस खूप तणावाचा जाणवेल. विचारांवर लक्ष द्या. नकारात्मक गोष्टी, विचार आणि माणसं यांना आज जरा स्वतः पासून दूरच ठेवा. पैशांची तंगी जाणवेल. त्यामुळे खूप तणावाचा दिवस असेल.
कन्या - आज या राशींच्या व्यक्तींना धनलाभ होईल. पुढचे अनेक दिवस तुम्हाला या सगळ्याचा लाभ होईल. काम करत असताना महत्वाचे निर्णय घ्या. या निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरतील. कुटुंबाकडे विशेषतः आई-वडिलांकडे लक्ष द्या. त्यांच आरोग्य सांभाळा.
तूळ - आज तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडून सकारात्मक विचार मिळतील. महत्वाचे निर्णय जवळच्या व्यक्तीशी संवाद साधून घ्या. याचा लाभ आता आणि पुढे देखील होतील. आर्थिक, मानसिक स्थिती बदलण्याचे दिवस जवळ आले आहेत.
वृश्चिक - आज एक समस्या दूर कराल तर पुढे दुसरी समस्या उभी असेल. त्यामुळे सतत चांगल चिंतन, सकारात्मक विचार यांचा आधार घ्या. शक्यतो प्रवास टाळा. दिवस खूप तणावाचा आहे. नोकरी किंवा व्यवसायात छोटा फटका पडेल.
धनू- धनू राशीच्या लोकांना आजचा दिवस खूप छान असेल. धनलाभ होणाऱ्या राशींमध्ये धनू या राशीचा क्रमांक आहे. नवीन वर्षांतला आजचा पहिला शनिवार असेल जो तुम्ही आनंदाने घालवाल. कामात लक्ष द्या. नवीन गोष्टी घडणार आहेत. त्याच्या स्वागतासाठी तयार राहा.
मकर - आजच्या दिवशी आजूबाजूला लोकांकडून मदत मिळेल. ही मदत येणाऱ्या काळासाठी अत्यंत गरजेची आहे. कामात लक्ष द्या. कुटुंबासोबत मेजवानीचा प्लान कराल. मुलांसाठी विशेष वेळ काढा. त्यांच्यासोबत आऊटिंगचा प्लान कराल.
कुंभ - धनलाभ होणाऱ्या राशींमध्ये कुंभचा देखील समावेश आहे. या राशींच्या लोकांनी आजचा दिवस शांत राहणंच योग्य आहे. काही वेळा शांतताच बरंच काही बोलून जाते. शब्दाने वाद करू नका. कामाकडे लक्ष द्या.
मीन - आजचा दिवस तुमचा आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सकारात्मक विचार हाच आजचा मूलमंत्र आहे. नवीन योजना आखाल. परिवारासोबत बेत कराल. महत्वाचं म्हणजे धनलाभ होण्याचा योग आहे.