आजचे राशिभविष्य | बुधवार | 2 जानेवारी 2019

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Jan 2, 2019, 03:40 PM IST
आजचे राशिभविष्य | बुधवार | 2 जानेवारी 2019  title=

मेष : अडचणीतून मार्ग निघू शकतो. अचानक लाभ होऊ शकतो. कामामध्ये मन लागेल. सकारात्मक राहा. जे काही मनात येईल ते तात्काळ करायचा प्रयत्न करा. काहीही करण्याआधी विचार नक्की करा. पैशांची प्रकरण सोडवण्यात यशस्वी व्हाल. घराच्या बाबतीत तुमचे प्लान योग्य ठरतील. रोजच्या कामात अडथळा येणार नाही. राजकारणाशी जोडल्या गेलेल्यांना फायदा होईल. 

वृषभ : तुम्ही थोडे चंचल आहात. आईचे सुख मिळेल. वेळेप्रमाणे सर्वकाही ठिक होईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. अडलेली काम मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. ज्यांना तुम्ही तुमच्या भावना सांगाल त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतील. मनाच ऐकाल तर सर्व काही ठिक होईल. तुमची कमाई आणि खर्च बरोबर राहतील. 

मिथुन : मित्र आणि भावांची मदत मिळेल. अचानक कोणत तरी खास काम करावे लागेल. आज अशीच काम करा जी लवकर पूर्ण होतील. आज होणारे जास्तीत जास्त निर्णय हे तुमच्याच बाजूने असतील. पारिवारीक गरजा आणि कामांसाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. 

कर्क : तुम्ही खूप उत्साही असाल. खूप साऱ्या जबाबदाऱ्यात तुम्ही व्यस्त असाल. व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. कोणत जुनं कामही आज पूर्ण होऊ शकतं. मुलांची मदत होऊ शकते. विवाहाचे प्रस्तावही मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे कमावण्याचे मार्ग मिळू शकतात. 

सिंह : कार्यक्षेत्रात होणाऱ्या मोठ्या कामांचे निकाल समोर येतील. नवे प्रेम संबंध सुरू होतील. तुमच्या डोक्यात पैशांसंबंधी प्लानिंग सुरू होईल. प्रेम आणि मुलांचा विचार करुन जास्त भावनिक व्हाल. जुन्या मित्राला भेटण्याचा योग आहे. नव्या नोकरी बद्दलही कळण्याची शक्यता आहे. कामाच्या संदर्भात प्रवास होण्याची शक्यता आहे. 

कन्या : व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. तुमच्या महत्वकांक्षाही ठळक होतील. जवळपासच्या किंवा खास लोकांना तुमची गरज लागेल. प्रवासाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील. तुमची काही कामंही पूर्ण होतील. आज तुम्हाला चांगला अनुभव येईल.

तुळ : तुमचे लक्ष परिवार आणि पैशांवर असेल. प्रत्येक क्षणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न कराल. तुमची सर्व काम सहज आणि वेळेत होतील. तुम्हाला ऑफिसमध्ये पुरस्कार किंवा सन्मान मिळू शकतो. कामामधील व्यस्तता वाढेल.  काही गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने होतील. धन लाभ होण्याची शक्यता आहे. आई वडील, भाऊ-बहिणींची मदत मिळेल. 

वृश्चिक : तुमच्या कामकाजावर लक्ष द्या. कोणताही व्यत्यय न आणता काम करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे काम यशस्वी होईल. तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विवाह प्रस्ताव देखील येण्याचे योग आहेत. नवे मित्र बनवाल. तुमचे मन प्रसन्न असेल. सर्वांशी प्रेमाने व्यवहार कराल. आजुबाजू आणि जवळच्या सहकार्यांची साथ मिळेल. 

धनु : तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. नवी जमीन किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार येऊ शकतो. राहण्याची किंवा कामाची जागा बदलण्याची ईच्छा होऊ शकते. परिवार आणि आवडत्या व्यक्तींवर खर्च करण्याचा विचारही करु शकता. विचार केलेले काम पूर्ण करण्यात मन लागेल. अशी काम करण्याच्या योजना होतील ज्याने तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. अडकलेलला पैसा मिळेल. 

मकर : तुमची अडचण किंवा भावनात्मक अडचण दूर होईल. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपून जाईल. तुम्हाला अनेक कामात जबाबदारी संभाळावी लागेल. ज्या गोष्टी तुमच्यासाठी वास्तवात गरजेच्या असतील त्यांना प्राधान्य द्याल. तुम्ही अचानक कोणतातरी निर्णय घ्याल. 

कुंभ : कोणती तरी आनंदाची बातमी मिळू शकते. अर्धवट आणि अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस ठिक आहे. रोजच्या कामातून फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात तुम्हाला यश मिळेल.  कोणत्या सहकार्यासोबत मिळून केलेले काम यशस्वी होईल. मित्रांसोबतच्या कार्यक्रमात तुमचे लक्ष असेल.

मीन : पुढे जाण्यासाठी तुम्हाला एकाहून अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. पैशांच्या प्रकरणात तुम्हाला बारीकसारीक विचार करावा लागेल. काही खास काम आज पूर्ण होतील. नव्या व्यक्तींबद्दल आकर्षण निर्माण होईल. आत्मविश्वासाने रोजची काम पूर्ण कराल.नव्या माणसांशी भेट होईल. 

-दीपक शुक्ला